Join us
Daily Top 2Weekly Top 5

"प्रियांका गांधींचा कुर्ता पकडणाऱ्या पोलिसावर तत्काळ कारवाई करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 03:45 IST

भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची मागणी

मुंबई : उत्तर प्रदेशातील नोएडा पोलिसांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा कुर्ता पकडण्याची घटना अत्यंत खेदजनक असून, या प्रकरणी संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली.वाघ यांनी टिष्ट्वटरवरून ही मागणी करताना भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडून संबंधित पोलिसांवर तत्काळ कारवाईची अपेक्षा आहे. एका महिला नेत्याच्या कपड्यांवर हात टाकण्याची पोलिसांची हिंमतच कशी होते? पोलीस कुठल्याही राज्याचे असले तरी त्यांनी त्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करता कामा नये, असे म्हटले आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या समवेत हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्याशी गैरवर्तन केले. एका पोलिसाने तर प्रियांका गांधी यांचा कुर्ता पकडला. पोलिसांच्या या गैरवर्तनाबद्दल देशभर संताप व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी त्यांची माफी मागितली.

टॅग्स :हाथरस सामूहिक बलात्कारप्रियंका गांधीचित्रा वाघ