घर घेणा:यांनो सावधान !
By Admin | Updated: November 28, 2014 02:20 IST2014-11-28T02:20:02+5:302014-11-28T02:20:02+5:30
मुंबईतील सातशे ते आठशे जणांना कल्याण येथे केवळ साडेतीन लाखांध्ये 1 बीएचके घर देण्याच्या बहाण्याने एका टोळीने 15 ते 2क् कोटींचा गंडा घातला आहे.

घर घेणा:यांनो सावधान !
समीर कणरुक -मुंबई
दिवसेंदिवस मुंबई शहारात वाढणा:या घरांच्या किमतीमुळे अनेक जण मुंबई बाहेर घर घेणो पसंत करतात. अशाच प्रकारे मुंबईतील सातशे ते आठशे जणांना कल्याण येथे केवळ साडेतीन लाखांध्ये 1 बीएचके घर देण्याच्या बहाण्याने एका टोळीने 15 ते 2क् कोटींचा गंडा घातला आहे. याबाबत या गुंतवणूकदारांनी कल्याणमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस या घोटाळ्याकडे पूर्णपणो दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या गुंतवणूकदारांनी केला आहे.
कल्याण पूर्व भागातील मलंगरोड परिसरात असलेल्या नेवाळी गावात केवळ 2 लाखांत 1 आरके, साडेतीन लाखांत 1 बीएचके, 4 लाख 2क् हजारांत 2 बीएचके अशी जाहिरात 2क्12 मध्ये आर.के. आकृती या विकासकाने अनेक वृत्तपत्रंमध्ये दिली होती. ही जाहिरात पाहून घाटकोपर, चेंबूर, देवनार, मानखुर्द येथील अनेकजण याठिकाणी गेले. साडे-तीन लाखांत स्वत:चे घर मिळत असल्याने या लोकांनी तत्काळ त्याठिकाणी जाऊन घरांची पाहाणी केली. आकृती बिल्डरचे मालक संतोष भानुसे, इरफान खान आणि राकेश सिंह यांनी रितसर या लोकांचे अॅग्रीमेंट तयार केले. यासाठी पहिल्यांदा 1क् हजार रुपये बुकिंगची रक्कम घेतली. त्यानंतर एका महिन्यात दीड लाख रुपये जमा करण्यास सांगून प्रत्येकी पाच हजारांचा महिना हप्ता ठरवून घेतला. तसेच 1 वर्षात रुमचा ताबा मिळेल, असे आश्वासन या गुंतवणूकदारांना देण्यात आले. त्यानुसार नवी मुंबई आणि मुंबईतील सातशे ते आठशे लोकांनी या घरांसाठी 15 ते 2क् कोटींची रक्कम गुंतवली होती.
वर्ष संपल्यानंतर देखील घराचा ताबा मिळण्याबाबत काही निरोप येत नसल्याने अनेकांनी विकासकाचे कार्यालय गाठले. मात्र काही सरकारी अडथळ्य़ामुळे काम थांबले असल्याचे कारण समोर ठेऊन या भामटय़ांनी एक वर्ष या गुंतवणूकदारांना खोटी आश्वासने दिली.
मात्र दोन वर्ष हप्त्यांची रक्कम जाऊन सुध्दा घराचा ताबा मिळत नसल्याने दिवाळीपूर्वी काही जण कल्याणमधील नाना-नानी पार्क येथे असलेल्या या विकासकाच्या कार्यालयावर पोहचले. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे कार्यालय बंद झाल्याचे त्यांना चौकशी दरम्यान समजले. जस-जशी ही माहिती इतर गुंतवणूकदारांनी समजली त्यांनी सर्व कागदपत्र घेऊन कल्याण गाठले. अखेर सर्वजण एकत्र येऊन त्यांनी कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाणो गाठले. याठिकाणी त्यांनी या तिन्ही आरोपींविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी यातील एकाच आरोपीला आत्तार्पयत अटक केली आहे. (प्रतिनिधी)
घर विकून भरले पैसे..
मुंबईतील घर विकून 1क् लाख मिळत असल्याने काही जणांनी कल्याणमधील या घरांसाठी साडेतीन लाख, तर कोणी चार लाख रोख भरले होते. मात्र विकासकाने गंडा घातल्याने अनेकांवर आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. घाटकोपरच्या कामराज नगर येथे राहणारे राजेश्वर चौरसिया हे रिक्षाचालक आहेत. काबाड कष्ट करुन त्यांनी दोन लाखांची रक्कम मुलीच्या लगAासाठी जमा केली होती. मात्र पेपरमधील जाहिरात पाहून त्यांनी त्यांच्याकडे असलेले हे पैसे या घरासाठी गुंतवले होते. मात्र हे पैसे देखील बुडाल्याने घर तर गेलेच पण मुलीच्या लगAाचाही प्रश्न त्यांना भेडसावत आहे.