जनधन योजनेंतर्गत विम्याचा लाभ घ्या
By Admin | Updated: December 5, 2014 00:11 IST2014-12-05T00:11:46+5:302014-12-05T00:11:46+5:30
पंतप्रधान मोदी यांनी गरीब व गरजू जनतेसाठी जनधन योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत शून्य जमा खाती काढण्यात येत आहे

जनधन योजनेंतर्गत विम्याचा लाभ घ्या
अलिबाग : पंतप्रधान मोदी यांनी गरीब व गरजू जनतेसाठी जनधन योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत शून्य जमा खाती काढण्यात येत आहे व या योजनेंतर्गत आपली खाती उघडल्यास एक लाख रुपयांचा अपघात विमा देखील मोफत असल्याचे माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी सांगितले. जनधन योजना कार्यक्रमप्रसंगी नाईक बोलत होत्या.
माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सागर किनारा मित्र मंडळ व बँक आॅफ इंडिया यांच्या तर्फे जनधन योजनेअंतर्गत मोफत खाती काढण्यात आली. या वेळी तब्बल १५० गरजूंनी या योजनेचा लाभ घेत आपली खाती उघडली. या या कार्यक्र माला माजी नगराध्यक्षा नमिता नाईक, बँक आॅफ इंडियाचे मुख्य प्रबंधक अश्विन कपाडिया, सुनील धानोरकर, रमाकांत शिंदे, सत्यजित भगत, संतोष भगत, सायली कांबळे, सागर भगत, प्रवीण भगत, किशोर नाखवा, मिलिंद भगत आदी उपस्थित होते.
जुने तळकर नगर येथे अलिबाग नगर परिषदेमार्फत बुधवारी स्ट्रीट लाईटचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पाणीपुरवठा सभापती राकेश चौलकर, गे.ना. परदेसी , तळकर नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर दादा टाळकर, नीलेश वर्तक, राकेश जगताप, प्रभाकर पाटील, शैलेश पालवणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)