दंडाच्या नोटिशीला ‘ताज’ची केराची टोपली

By Admin | Updated: April 18, 2015 01:46 IST2015-04-18T01:46:05+5:302015-04-18T01:46:05+5:30

ताज हॉटेलने सुरक्षेच्या नावाखाली रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेड्स, फुलांच्या कुंड्या तत्काळ हटवून २ कोटी १३ लाख रुपये दंड भरण्याच्या पालिकेच्या नोटिशीला ताज महल पॅलेस हॉटेलने केराची टोपली दाखविली.

Taj karachi basket in the notice of the pen | दंडाच्या नोटिशीला ‘ताज’ची केराची टोपली

दंडाच्या नोटिशीला ‘ताज’ची केराची टोपली

मुंबई : अतिरेकी हल्ल्यानंतर ताज हॉटेलने सुरक्षेच्या नावाखाली रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेड्स, फुलांच्या कुंड्या तत्काळ हटवून २ कोटी १३ लाख रुपये दंड भरण्याच्या पालिकेच्या नोटिशीला ताज महल पॅलेस हॉटेलने केराची टोपली दाखविली. यामुळे संतप्त झालेल्या स्थायी समितीने शुक्रवारी हॉटेलची पाहणी करून अहवाल देण्याची ताकीद प्रशासनाला दिली़
ताज हॉटेलने सुरक्षेच्या नावाखाली सार्वजनिक रस्त्यावर गेल्या सहा वर्षांपासून स्टील बॅरिकेड्स लावून अतिक्रमण केले.या प्रकरणी पालिकेने हॉटेल व्यवस्थापनाला दंड ठोठावला.‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त सर्वप्रथम दिले होते़ या वृत्ताची दखल घेऊन स्थायी समितीने प्रशासनाला फैलावर घेतले़ (प्रतिनिधी)

Web Title: Taj karachi basket in the notice of the pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.