ताडवाडी बीआयटी चाळीत आग

By Admin | Updated: October 2, 2014 02:01 IST2014-10-02T02:01:19+5:302014-10-02T02:01:19+5:30

माझगाव येथील ताडवाडी बीआयटी चाळीतील चार खोल्यांमध्ये आज संध्याकाळी आगीचा भडका उडाला़ अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करीत या आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवल़े

Tadwadi BIT chawl fire | ताडवाडी बीआयटी चाळीत आग

ताडवाडी बीआयटी चाळीत आग

मुंबई : माझगाव येथील ताडवाडी बीआयटी चाळीतील चार खोल्यांमध्ये आज संध्याकाळी आगीचा भडका उडाला़ अग्निशमन दलाने शर्थीचे  प्रयत्न करीत या आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवल़े मात्र आगीच्या भीतीने दुस:या मजल्यावरून उडी मारल्यामुळे काही रहिवासी जखमी झाल़े सहा जखमींना ज़े ज़े रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े 
ताडवाडीतील चाळ क्ऱ 4 येथील दुस:या मजल्यावर नवरात्रौत्सवानिमित्त होम सुरू होता़ त्याच वेळी घरातील गॅस सिलिंडरमधून वायुगळती सुरू झाल्याने आगीने पेट घेतला़ रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन दलास पाचारण केल़े मात्र मदत पोहोचण्यापूर्वी आगीच्या भीतीने काही रहिवाशांनी दुस:या मजल्यावरून उडी मारली़ उंचावरून उडी मारल्यामुळे काहींना गंभीर दुखापती झाल्या 
आहेत़ 
अग्निशमन दलाच्या प्रत्येक चार गाडय़ा व पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाल़े तसेच रुग्णवाहिकेतून जखमींना तत्काळ ज़े ज़े रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल़े येथील चार रूमने पेट घेतल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती़ परंतु अग्निशमन दलाने संध्याकाळी पावणोसात वाजता आगीवर नियंत्रण मिळवल़े दरम्यान, जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजत़े (प्रतिनिधी)
 
आग नेमकी कशामुळे?
या चाळीतील एका मजल्यावर नवरात्रौत्सवानिमित्त होम सुरू होता़ 
तिथेच सिलिंडरने पेट घेतल्यामुळे ही आग लागल्याचे प्रथमदर्शी सांगत आहेत़ परंतु यास अद्याप अग्निशमन दलाने दुजोरा दिलेला नाही़ चौकशीनंतरच खरे कारण पुढे येईल, असे अधिका:यांनी सांगितल़े
 
जखमींची नावे
राजश्री नरेश सवडकर (वय 33), पूजा भूषण सवडकर 
(वय 21), नंदा महादेव सवडकर (वय 45), अंकिता नरेश सवडकर (वय 18), संजय धामणो (वय 34), महादेव सवडकर (वय 55).

 

Web Title: Tadwadi BIT chawl fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.