Join us  

मेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 6:09 AM

आगामी मेट्रो चाचण्यांची तयारी करण्यासाठी मेट्रोची टीम परिश्रमपूर्वक काम करीत आहे. एमएमओपीएल बरोबरच्या प्रशिक्षण सत्रात टीम मेट्रो परिचालनाचे विविध तंत्र शिकत आहेत. मेट्रो चाचण्यांसाठी सर्व यंत्रणा आदर्शपणे कार्य करत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी टीम विविध तपासण्या करीत आहे.

मुंबई :मुंबई इन मिनिट्स हे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वेगाने काम करत आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ येत्या काही महिन्यांत रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून, मेट्रो कोच येत्या काही दिवसांत मुंबईत दाखल होत आहेत. तत्पूर्वी येथील कामांनी वेग पकडला असून, मेट्रो टीमला देण्यात येत असलेले प्रशिक्षण आणखी वेगाने सुरू झाले आहे. याअंतर्गत मेट्रोच्या चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या सुरू झाल्या आहेत.आगामी मेट्रो चाचण्यांची तयारी करण्यासाठी मेट्रोची टीम परिश्रमपूर्वक काम करीत आहे. एमएमओपीएल बरोबरच्या प्रशिक्षण सत्रात टीम मेट्रो परिचालनाचे विविध तंत्र शिकत आहेत. मेट्रो चाचण्यांसाठी सर्व यंत्रणा आदर्शपणे कार्य करत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी टीम विविध तपासण्या करीत आहे. टीमने लाइन २ अ (दहिसर) येथे अर्थ-मॅट कामाची तपासणी केली. त्यांनी अंधेरी स्टेशन (पश्चिम) येथेही भेट देऊन अर्थ-मॅट इन्स्टाॅलेशनची तपासणी केली, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली.हैदराबाद येथे होत असलेल्या रोलिंग स्टाॅक जाॅब प्रशिक्षण आणि फर्स्ट रिस्पाॅन्डर प्रशिक्षण सत्रांचादेखील यात समावेश आहे. याशिवाय चारकोप मेट्रो डेपो येथेही प्रत्यक्ष साइटवर प्रशिक्षण सत्रे सुरू आहेत. नुकत्याच घेण्यात आलेल्या पॉईंट ऑपरेशन आणि अर्थ-रॉड प्लेसमेंट प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली असून, मेट्रो ट्रेन येण्यापूर्वी प्रकल्पांच्या विविध टप्प्यांतील कामे पूर्ण होण्यासाठी टीम वेगात कामे करीत आहे. कर्मचाऱ्यांसाठीच्या विविध विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचाही यामध्ये समावेश आहे, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सांगितले.

अथक परिश्रम -आगामी मेट्रो चाचण्यांची तयारी करण्यासाठी मेट्रोची टीम परिश्रमपूर्वक काम करीत आहे. एमएमओपीएल बरोबरच्या प्रशिक्षण सत्रात टीम मेट्रो परिचालनाचे विविध तंत्र शिकत आहेत. मेट्रो चाचण्यांसाठी सर्व यंत्रणा आदर्शपणे कार्य करत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी टीम विविध तपासण्या करीत आहे. टीमने लाइन २ अ (दहिसर) येथे अर्थ-मॅट कामाची तपासणी केली.

टॅग्स :मेट्रोमुंबई