Join us
Daily Top 2Weekly Top 5

पडेल ते करतो काम, पण मिळत नाही दाम!; मुंबईकर कमाईत सगळ्यात मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 11:10 IST

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतातून लोक मुंबईमध्ये येतात...

मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेली स्वप्ननगरी मुंबईतील लोक मेहनत करण्यामध्ये जगामध्ये प्रथम स्थानावर आहेत. मात्र कमाईच्या बाबतीत सर्वात मागे आहेत. स्वीस बँक यूबीएसने जगभरातील 77  शहराचा सर्वे केला असून त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे.  

मुंबईतील लोक जगात सर्वाधिक तास काम करतात मात्र त्यांना हवातसा मेहनाताना मिळत नाही. न्यूयॉर्कमधील एका व्यक्तीने 54 तास काम केल्यास तो आयफोन विकत घेऊ शकतो मात्र मुंबईकराला आयफोन विकत घेण्यासाठी 917 तास काम करावे लागते. स्वीस बँक यूबीएसच्या सर्वेनुसार, मुंबईकर प्रतिवर्षी 3314.7 तास काम करतो. जगभरातील लोक सरासरी  1987 तास प्रतिवर्ष काम करतात. पॅरीस आणि रोममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा मुंबईतील लोक दुपट्ट काम करतात. रोममधील कर्मचारी प्रतिवर्ष 1581 आणि पॅरिसमधील 1662 तास काम करतात. 

कमाईच्या बाबतीत मुंबईकर जगात 76 व्या स्थानावर आहेत. कमाईमध्ये जिनेवा, ज्यूरिख आणि लग्जमबर्ग अव्वल स्थानावर आहेत. 

टॅग्स :मुंबई