मुंबईत स्वाइनचा कहर
By Admin | Updated: March 8, 2015 02:30 IST2015-03-08T02:30:48+5:302015-03-08T02:30:48+5:30
स्वाइन फ्लूमुळे गेल्या चार दिवसांत मुंबईत चार मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सात इतकी झाली असून आतापर्यंत ७५४ रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईत स्वाइनचा कहर
चार दिवसांत चार मृत्यू
मुंबई : स्वाइन फ्लूमुळे गेल्या चार दिवसांत मुंबईत चार मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सात इतकी झाली असून आतापर्यंत ७५४ रुग्ण आढळून आले आहेत. ७ मार्च रोजी मुंबईत स्वाइनचे ५२ रुग्ण आढळले आहेत.
त्यापैकी ३० पुरुष असून २२ महिला आहेत. मुंबईतील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईबाहेरून २ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. एका रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)