स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले
By Admin | Updated: April 19, 2015 23:15 IST2015-04-19T23:15:45+5:302015-04-19T23:15:45+5:30
जिल्ह्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मुरुड तालुक्यात नितेश नामदेव देवलटकर याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले
अलिबाग : जिल्ह्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मुरुड तालुक्यात नितेश नामदेव देवलटकर याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या कुटुंबातील आठ जणांना संशयित म्हणून अलिबागच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
आतापर्यंत ६९ संशयितांची संख्या झाली असून पैकी २० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचप्रमाणे सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नितेश याला १५ एप्रिलला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते.
त्याच्या अहवालात स्वाइन फ्लू झाल्याचे सिध्द झाल्याने त्याच्या सहवासात आलेले महेश देवलटकर (४५), साईराज नितेश देवलटकर (५), भाग्यश्री नितेश देवलटकर (११),अवंतिका नितेश देवलटकर (१०), मानसी महेश देवलटकर (११), रेखा महेश देवलटकर (३७), तेजश्री नीलेश देवलटकर (१४), धनश्री नीलेश देवलटकर यांना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले आहे.
त्यांच्या रक्ताचे नमुने सोमवारी घेऊन हाफकिन प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी लोकमतला दिली. नितेश याच्यावर योग्य तो औषधोपचार करण्यात येत असून संशयितांनाही देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याचे डॉ.गवळी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)