Join us

स्वाइन फ्लूने घेतला १३५ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 06:50 IST

सध्या राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. एरव्ही थंडीत आढळणाऱ्या स्वाइन फ्लूने आता उन्हाळ्यातही डोके वर काढले आहे.

मुंबई : सध्या राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. एरव्ही थंडीत आढळणाऱ्या स्वाइन फ्लूने आता उन्हाळ्यातही डोके वर काढले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या पाच महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे तब्बल १३५ बळी गेले आहेत, तर राज्यात १ हजार ४८६ स्वाइन फ्लूचे रुग्ण असून, पुण्यातील चार रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. नाशिकमध्ये ३३, नागपूर १६, पुणे मनपा १२ आणि अहमदनगर १४ बळी असून, शहर, तसेच जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूमुळे दगावलेल्यांची संख्या अधिक आहे.थंडीचे वातावरण स्वाइन फ्लू विषाणूच्या प्रसारासाठी पोषक असते, असा सर्वसाधारण समज आहे. यंदा मात्र, थंडी संपून उन्हाळा सुरू झाला, तरी स्वाइनचे रुग्ण आढळत आहेत. १ जानेवारी, २०१९ ते ७ मे, २०१९ पर्यंत राज्यात १ हजार ४८६ स्वाइनचे रुग्ण आढळले. १७ हजार ८७५ संशयितांना आॅसेलटॅमिवीर गोळ्या देण्यात आल्या, तर पाच महिन्यांत १ हजार १७५ रुग्ण संपूर्ण बरे झाले आहेत. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये अद्यापही १७६ रुग्ण उपचार घेत आहेत.स्थलांतरामुळे विषाणूंच्या प्रसाराची प्रक्रिया सुरूचराज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, राज्यात उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरुवात झाली असली, तरी अनेक ठिकाणी रात्रीचे, सकाळचे तापमान आणि दिवसभराचे तापमान यात तफावत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची संख्या अद्याप शून्यावर आलेली नाही. स्वाइन फ्लू सदृश लक्षणे दिसणाºया रुग्णांचे स्थलांतर हादेखील चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची प्रक्रिया सुरूच राहाते. हे टाळण्यासाठी विषाणूजन्य आजाराची प्राथमिक लक्षणे दिसल्यास तातडीने औषधोपचार घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :स्वाईन फ्लू