घुमान संमेलनाची दखल नाही
By Admin | Updated: April 15, 2015 01:27 IST2015-04-15T01:27:07+5:302015-04-15T01:27:07+5:30
शासनातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देण्यात आले असले तरी घुमानला झालेल्या ८८ व्या संमेलनात काय घडले,

घुमान संमेलनाची दखल नाही
मुंबई : शासनातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देण्यात आले असले तरी घुमानला झालेल्या ८८ व्या संमेलनात काय घडले, संमेलन कसे झाले इत्यादीविषयी शासनाला पार स्वारस्य असल्याचे दिसत नाही. कारण शासनाच्या marathibhasha.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर घुमानच्या ऐतिहासिक साहित्यसंमेलनाबद्दल काहीच माहिती दिलेली नाही.
या संकेतस्थळावर केवळ २०१२ पर्यंतच्या साहित्य संमेलनाच्याच नोंदी आहेत. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य याविषयी विचारले असता, त्यांनी या विभागाचा कायापालट होण्याची प्रक्रिया सुरु आहे. संकेतस्थळ अद्ययावत झाल्यास त्यावर या सर्व नोंदी व्यवस्थित अंर्तभूत करु असे सांगितले.
मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावर वर्ष, ठिकाण, संमेलनाध्यक्ष आणि शासनाने मंजूर केलेले अनुदान यांच्या नोंदी असतात. परंतु, मराठी भाषा विभागाप्रमाणेचे या विभागाचे संकेतस्थळ कात टाकण्याची वाट पाहत आहे. (प्रतिनिधी)