मतदार साक्षरतेसाठी ‘स्वीप-2’
By Admin | Updated: September 16, 2014 22:43 IST2014-09-16T22:43:52+5:302014-09-16T22:43:52+5:30
मतदारांमध्ये अधिक साक्षरता व जागृती करण्याच्या उद्देशाने ‘स्वीप-2’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

मतदार साक्षरतेसाठी ‘स्वीप-2’
अलिबाग : मतदारांमध्ये अधिक साक्षरता व जागृती करण्याच्या उद्देशाने ‘स्वीप-2’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार जनजागृतीचे जिल्ह्यात उत्तम काम झाले असून आगामी विधानसभा निवडणुकीही या कार्यक्रमाची अंमलबजावणी करु न मतदार नोंदणी होऊन मतदान 75 टक्के होईल, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित स्वीप-2 च्या कार्यक्र म अंमलबजावणी संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) किरण पाणबुडे, पनवेल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे, खोपोलीचे मुख्याधिकारी दीपक सावंत, पेणचे मुख्याधिकारी प्रल्हाद रोडे, रोह्याचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, कर्जतचे मुख्याधिकारी डी.एम.अटकोरे, माथेरानचे मुख्याधिकारी पी.एन.ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, राजेश कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी एच.आर.भोसले, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद जाधव, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी सोनार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भांगे म्हणाले, 18ते 19 या वयोगटातील युवकांच्या मतदानाच्या प्रमाणात वाढ करणो, शहरी क्षेत्नामध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे, वंचित समाज वा समूह यांची मतदार नोंदणी वाढावी आणि मतदानामध्ये त्यांचा सहभाग वाढावा,मतदारांचा सहभाग वाढावा, अनिवासी भारतीयांची जास्तीत जास्त प्रमाणात मतदार म्हणून नोंदणी करणो, टपाली मतदान प्रमाण गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठया प्रमाणात वाढावे, ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)
च्सूचनांनुसार चर्चासत्ने, परिसंवाद, महोत्सव, स्पर्धा, पथनाटय़े आदिंच्या माध्यमातूनही हे स्वीप-2 अभियान यापुढेही अधिक जोरदारपणो राबविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी तसेच जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख, जिल्हा परिषद, आदिंच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात यावेत, अशाही सूचना जिल्ह्याधिका:यांनी यावेळी दिल्या. बैठकीच्या प्रारंभी निवडणूक उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वेटकोळी यांनी स्वीप-2 संदर्भात उपस्थितांना माहिती दिली. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.