‘स्वप्नपूर्ती’ची संगणकीय सोडत जाहीर

By Admin | Updated: November 30, 2014 01:32 IST2014-11-30T01:32:18+5:302014-11-30T01:32:18+5:30

खारघर सेक्टर 36 येथे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पाची संगणकीय सोडत शनिवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

'Swannapurni' computer leaked | ‘स्वप्नपूर्ती’ची संगणकीय सोडत जाहीर

‘स्वप्नपूर्ती’ची संगणकीय सोडत जाहीर

नवी मुंबई: खारघर सेक्टर 36 येथे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पाची संगणकीय सोडत शनिवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात आली. ज्यांना घरे मिळाली अशा 3 हजार अर्जदारांना ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष संजय भाटीया यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 
स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात एकूण 3 हजार 154 घरे आहेत. यात आर्थिक दुर्बल घटकांसाठी 7क्4 तर मध्यम उत्पन्न गटासाठी 2 हजार 45क् घरे आहेत. या दोन्ही गटांतील घरांसाठी एकूण 86 हजार 855 
अर्ज ‘सिडको’कडे आले होते. 
या सोडतीसाठी सिडकोच्या 
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रलयाच्या प्रमाणिकरण परीक्षण आणि दर्जा प्रमाणपत्र (एसटीक्यूसी) संचालनालयाने प्रमाणित केलेल्या विशेष संगणक प्रणालीच्या माध्यमातून ही सोडत काढण्यात आली. या प्रणालीत  अर्जदारांची नोंदणी करण्यात आली होती. सिडकोच्या इतिहासात प्रथमच संगणकीय सोडत संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपित करण्यात आली. 
सिडको भवनमधील सभागृहात निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस.डी. धर्माधिकारी, ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे संपादक विनायक पात्रुडकर, मागसवर्गीय कक्ष अधिकारी कल्पना जगताप भोसले, माहिती अधिकारातील कार्यकर्ते संदीप ठाकूर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे उप-महाव्यवस्थापक सोनी आणि नवी मुंबई स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष फादर अल्मेडा यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.
सोडतीसाठी निमंत्रित केलेल्या निवडक अर्जदारांपैकी आर्थिक मागसवर्गीय गटातील तानाजी शेलार (माजी सैनिक प्रवर्ग) आणि सुहास गोसावी (पत्रकार प्रवर्ग) यांचा संजय भाटीया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विजेत्यांच्या याद्या विशेष निमंत्रित पर्यवेक्षकांनी स्वाक्षरी करून साक्षांकित केल्या आहेत. त्या ‘सिडको’च्या  वेबसाईटवर पाहता येतील. 
सोडतीत अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांचे नोंदणीशुल्क ‘सिडको’तर्फे 1क् डिसेंबर 2क्14पासून टीजेएसबी आणि अॅक्सिस बँकेतर्फे ईसीएस किंवा डीडीमार्फत पाठविण्यात येणार आहे. तर यशस्वी अर्जदारांना इरादापत्रे रजिस्टर्ड पोस्टाने 2क् डिसेंबर 2क्14र्पयत पाठविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title: 'Swannapurni' computer leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.