मुलुंडमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: July 5, 2016 20:18 IST2016-07-05T20:18:12+5:302016-07-05T20:18:12+5:30
मुलुंडमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली. प्रकाश मुर्गेश उडीयाड असे मृत तरुणाचे नाव आहे

मुलुंडमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू
ऑनलाइ लोकमत
मुंबई, दि. ५ : मुलुंडमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली. प्रकाश मुर्गेश उडीयाड असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मुलुंड पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात प्रकाश हा भावासोबत राहायचा. त्याचे लग्न झाले नव्हते. तो मजुरी करुन भावाला घरखर्चात मदत करत असे. सोमवारी रात्रीच्या सुमारास पाणी पिण्यासाठी उठलेल्या भावाला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घरातील लोखंडी खांबाला लुंगीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलीस तेथे दाखल झाले. प्रकाशला मुलुंड अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. मुलुंड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्या दिशेने पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.