लंडन ठुमकदा गाण्याचे पार्श्वगायक जांजुआ यांचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: October 23, 2015 09:11 IST2015-10-23T03:59:49+5:302015-10-23T09:11:51+5:30
लंडन ठुमकदा, जी करदा अशी अनेक हिट गाणी गाणारे बॉलिवूडमधील पार्श्वगायक लाभ जांजुआ यांचा मृत्यू झाला आहे.

लंडन ठुमकदा गाण्याचे पार्श्वगायक जांजुआ यांचा संशयास्पद मृत्यू
मुंबई : लंडन ठुमकदा, जी करदा अशी अनेक हिट गाणी गाणारे बॉलिवूडमधील पार्श्वगायक लाभ जांजुआ यांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी लाभ जांजुआ यांचा त्यांच्या घरात मृतदेह आढळला. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज असून शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पार्टनर, सिंग इज किंग, क्वीन, गरम मसाला, देव डी अशा अनेक चित्रपटांमध्ये जांजुआ यांनी गायलेली गाणी लोकप्रिय ठरली होती. मूळचे पंजाब येथे राहणारे जांजुआ गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगाव येथे एकटेच राहत होते. त्यांचे कुटुंबीय पंजाबात आहेत.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे जांजुआ अलीकडेच काही दिवस रुग्णालयात
दाखल होते. गुरुवारी सकाळी
मोलकरीण घरी आली असता जांजुआ बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळले. तिने शेजाऱ्यांना हे सांगितल्यानंतर शेजाऱ्यांनी बांगूर नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. (प्रतिनिधी)