निलंबित निरीक्षकाला पोलीस कोठडी

By Admin | Updated: July 10, 2016 02:37 IST2016-07-10T02:37:53+5:302016-07-10T02:37:53+5:30

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक मदन दराडे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे यांना कल्याण गुन्हे

Suspended observer police cell | निलंबित निरीक्षकाला पोलीस कोठडी

निलंबित निरीक्षकाला पोलीस कोठडी

कल्याण : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक मदन दराडे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे यांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. कल्याण न्यायालयाने त्यांना शनिवारी १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी दराडे यांच्यावर ओव्हरटेक करत त्यांची गाडी अडवली. त्यानंतर, दराडे यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत तेथून पलायन केले. मात्र, गोळी दराडे यांच्यासमोरील काचेस लागून डॅशबोर्डमध्ये घुसल्याने त्यांचा जीव वाचला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Suspended observer police cell