सीएनजी पंपांवरील कारवाई स्थगित

By Admin | Updated: October 30, 2014 01:14 IST2014-10-30T01:14:21+5:302014-10-30T01:14:21+5:30

मॉडेल अॅप्रुव्हल न घेतलेल्या आणि गेल्या दोन दिवसांपासून कारवाईचा बडगा सुरू असलेल्या सीएनजी पंपचालकांना महिनाभरासाठी अखेर दिलासा मिळाला आहे.

Suspended action on CNG pumps | सीएनजी पंपांवरील कारवाई स्थगित

सीएनजी पंपांवरील कारवाई स्थगित

मुंबई : मॉडेल अॅप्रुव्हल न घेतलेल्या आणि गेल्या दोन दिवसांपासून कारवाईचा बडगा सुरू असलेल्या सीएनजी पंपचालकांना महिनाभरासाठी अखेर दिलासा मिळाला आहे. सीएनजी पंपांवरील कारवाईला एक महिन्यासाठी स्थगिती देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत वैध मापनशा यंत्रणोने घेतला आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणो आणि नवी मुंबईतील सीएनजी पंपांवरील महासंकट महिनाभरासाठी तरी टळले आहे.
याआधी सोमवारपासून मॉडेल अॅप्रुव्हल न घेतलेल्या महानगर गॅसचे सीएनजी पंप बंद करण्याची कारवाई शासनाने सुरू केली होती. त्याची सुरुवात मुंबईतील 3क्हून अधिक पंप बंद करून झाली होती. त्या वेळी पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशनने महानगर गॅस कंपनीकडे धाव घेतली होती. त्यानुसार कारवाई तात्काळ थांबवून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किमान महिनाभराचा अवधी देण्याची मागणी महानगर गॅस कंपनीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे केली होती. ही मागणी पूर्ण करीत विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी पंपचालकांवरील कारवाई तूर्तास थांबवण्याचे मान्य केले आहे. मात्र महिनाभरात प्रमाणपत्र मिळवले नाही तर कारवाईस पुन्हा सुरुवात करण्यात येईल, असेही सांगितले. 
दरम्यान, दोन दिवसांत यंत्रणोने कारवाई करीत बंद केलेले 3क्हून अधिक पंप पुन्हा सुरू करण्याची मागणी मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवि शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 139 पंपांपैकी 32 पंपांकडे मॉडेल अॅप्रुव्हल प्रमाणपत्र आहे. उर्वरित 1क्7 पंपांपैकी 3क् ते 4क् पंप शासनाने कारवाई करीत बंद केले आहेत. इतर पंपांना शासनाने महिनाभराचा अवधी दिला असून, पंप सुरू ठेवण्याची परवानगीही दिली आहे. मात्र कारवाईदरम्यान बंद केलेले पंप पुन्हा सुरू करण्याबाबत आदेश दिलेले नाही. तरी गुरुवारी यासंदर्भात संघटना पुन्हा एकदा अधिका:यांची भेट घेऊन कारवाई करीत बंद केलेले पंप पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी करणार आहे.
 
नुकसान सर्वाचेच
बंद केलेल्या सीएनजी पंपचालकांचे दिवसाला लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शिवाय 25 टक्क्यांहून अधिक पंप बंद असल्याने इतर पंपांवर ताण येत असून, लवकरच सीएनजीची कमतरता भासण्याची शक्यता  आहे. इतर पंपांवर टॅक्सींच्या रांगा लागत असून, टॅक्सीचालकांच्या वेळेचाही अपव्यय होत आहे. त्याचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतूक कमी होऊन प्रवाशांना बसत असल्याचे समजते.

 

Web Title: Suspended action on CNG pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.