संशयित आरोपीची पोलीस ठाण्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 06:28 IST2017-08-18T06:28:55+5:302017-08-18T06:28:57+5:30

संशयित आरोपीने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मुंबईत घडला.

Suspected accused commits suicide in police station | संशयित आरोपीची पोलीस ठाण्यात आत्महत्या

संशयित आरोपीची पोलीस ठाण्यात आत्महत्या

मुंबई : संशयित आरोपीने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मुंबईत घडला. विजय रमेश साळवी (२०) असे मृताचे नाव असून याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
विजयला गुरुवारी अंधेरी पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी दुपारी त्याची चौकशी सुरू होती. त्या वेळी जवळपास कोणी नसताना त्याने स्वत:च्या बनियनने पोलीस ठाण्यातच गळफास घेतला.
>हा प्रकार कोठडीत घडला की, चौकशीच्या खोलीत याबाबत अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहे.

Web Title: Suspected accused commits suicide in police station