Join us  

Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूनंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांचा रोख कोणाकडे?; मला माहिती होतं, तुझा दोष नव्हता, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 3:53 PM

तु ज्या दु:खातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमकुवत केले, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन अनेकदा अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आकस्मित मृत्यूमुळे अनेक प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित राहिली आहेत. अभिनेते, लेखक, दिग्दर्शक सगळेच जण या घटनेवर शोक व्यक्त करत आहेत. वयाच्या ३४ व्या वर्षी एका हरहुन्नरी कलाकाराने इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. प्रत्येकजण यावर प्रतिक्रिया देत आहे. लेखक-दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही सुशांतच्या मृत्यूवर शोक प्रकट केला आहे.

याबाबत शेखर कपूर यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, तु ज्या दु:खातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमकुवत केले, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन अनेकदा अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. त्यांची कहाणी मला माहिती आहे. जर मी मागील ६ महिने तुझ्यासोबत असतो, आपलं बोलणं झालं असतं. जे काही झालं त्यात तुझा दोष नाही तर त्यांचे कर्म होते. शेखर कपूर यांच्या पोस्टचा इशारा अनेकांकडे जातो. बॉलिवूडमध्येही चर्चा आहे की, सुशांतला टॉपच्या दिग्दर्शकांकडून काम दिलं जात नसल्याने तो हताश होता. काही मोठ्या बॅनर्ससोबत काम करतानाही सुशांतवर बंदी आणली होती. पण या केवळ चर्चा आहे याचे पुरावे कोणाकडेच नाहीत.

शेखर कपूर आणि सुशांत सिंग राजपूर यांनी पानी सिनेमात एकत्र काम केले होते, या सिनेमाला कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही समाविष्ट केले होते, परंतु यशराज बॅनरने हात काढून घेतल्याने ही फिल्म थंड पडली. शेखरला हा सिनेमा ऋतिक रोशनसोबत करण्याची इच्छा होती. पण आशुतोष गोवारीकर यांच्या मोहनजोदारो सिनेमामुळे ऋतिकला या सिनेमाचा हिस्सा होता आलं नाही. याशिवाय शेखर या सिनेमात अनेक हॉलिवूडमधील कलाकार घेऊ इच्छित होते. पण शेवटी त्यांनी सुशांत सिंग राजपूतचं सिलेक्शन केले.

शेखर कपूर यांनी असंही सांगितले की, सुशांतने या प्रोजेक्टसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. ज्यावेळी यशराजने या सिनेमा बनवण्यापासून नकार दिला त्यावेळी सुशांत खूप नाराज झाला.  तर सुशांतच्या मृत्यूनंतर लोक करण जोहर, आलिया भट्टसारख्या सेलिब्रिटींना ट्रोल करत आहेत. सुशांत हा सामान्य कुटुंबातील असून कोणताही स्टार किड नसल्याने त्याला इंडस्ट्रीमध्ये नेपोटिज्मचा सामना करावा लागत होता.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतशेखर कपूरबॉलिवूड