Join us  

Sushant Singh Rajput Death Case: ईडीकडून रिया चक्रवर्ती, भाऊ, वडिलांचे मोबाइल, लॅपटॉप जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 6:03 AM

चक्रवर्ती कुटुंबीयांनी अनेक प्रश्नांची उत्तरे विसंगत व असमाधानकारक दिल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी आठ तास कसून चौकशी केली होती.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील आर्थिक अनियमितता (मनी लॉड्रिंंग) प्रकरणी गुन्हा दाखल असलेली त्याची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे दोन मोबाइल व लॅपटॉप सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केले. तसेच तिचे वडील इंद्रजीत व भाऊ शोविकचेही मोबाइल ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या तपासणीतून अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.चक्रवर्ती कुटुंबीयांनी अनेक प्रश्नांची उत्तरे विसंगत व असमाधानकारक दिल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी आठ तास कसून चौकशी केली होती. या वेळी त्यांनी गुंतवणुकीबद्दल अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत उलटसुलट माहिती दिली. तपासणीसाठी सहकार्य करण्याची त्यांची मानसिकता नव्हती. त्यामुळे अधिकाºयांनी रियाचा लॅपटॉप, दोन मोबाइल, भाऊ शोविक व वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांचे मोबाइल जप्त केल्याचे समजते.रियाने ती दुसरा मोबाइल वापरत असल्याबद्दलची माहिती लपवून ठेवली होती. तिचा भाऊ व वडिलांच्या जबाबातून ही बाब समोर आली. त्यामुळे अधिकाºयांनी तिचा भाऊ शोविकला घरातून मोबाइल घेऊन आणण्यास लावले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी ईडीच्या बºयाच प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.रियाचे उत्पन्न आणि खर्च यात मोठा फरक असल्याचे इन्कम टॅक्स रिटर्नमधून स्पष्ट झाले आहे. मालमत्तेबद्दल कोणतीही समाधानकारक माहिती तिने दिलेली नाही. त्यामुळे मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केला असून त्याच्या तपासणीतून अनेक तपशील स्पष्ट होतील, असे ईडीच्या अधिकाºयांनी सांगितले.सिद्धार्थ, श्रुतीचीही कसून चौकशी दरम्यान, सुशांतसिंहचा रूम पार्टनर सिद्धार्थ पिठानी, माजी व्यवस्थापक श्रुती मोदी यांचीही ईडीने कसून चौकशी केली. त्यांची आर्थिक उलाढाल, त्यांनी सुशांतकडून घेतलेल्या रकमेबद्दल तपशील घेण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतअंमलबजावणी संचालनालय