Join us  

Sushant Singh Rajput Case: ...म्हणून एनसीबी रियाची रिमांड घेणार नाही; समोर आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 4:43 PM

दोन दिवस चौकशी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी रियाला अटक

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) अटक केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून रियाची चौकशी सुरू होती. त्यानंतर एनसीबीनं रियाला अटक केली आहे. मात्र एनसीबी रियाची रिमांड घेणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रिया सराईत गुन्हेगार नसल्यानं तिची रिमांड घेणार नसल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.गेल्या दोन दिवसांपासून रियाची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. अखेर आज तिसऱ्या दिवशी तिला अटक करण्यात आली आहे. मात्र एनसीबी रियाची रिमांड घेणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रिया सराईत गुन्हेगार नाही. तिचा ड्रग विक्रेत्यांशी थेट संबंध नाही. तिनं तीन दिवसांपासून चौकशीला सहकार्य केलेलं आहे. तिला कधीही चौकशीला बोलावलं जाऊ शकतं, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणाररियाची आतापर्यंत तीन तपास यंत्रणांनी ८२ तास चौकशी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून एनसीबीकडून रियाची चौकशी सुरू आहे. रियानं तिच्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक महत्त्वाची नावं घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या रियाला एनसीबीचे अधिकारी वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात नेलं जात आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास वैद्यकीय तपासणी होईल. रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीतरियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. एनसीबीने एनडीपीएस ऍक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे. रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. रियाचा भाऊ शोविक थेट ड्रग्स विक्रेत्यांच्या संपर्कात होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. पण रियाचा थेट ड्रग विक्रेत्यांशी संबंध नव्हता. त्यामुळे तिच्या रिमांडची गरज नसल्याचं एनसीबीतील सुत्रांनी सांगितलं आहे.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत