प्रदूषणमुक्तीसाठी सव्रेक्षण
By Admin | Updated: October 3, 2014 02:34 IST2014-10-03T02:34:26+5:302014-10-03T02:34:26+5:30
नोटीस बजाविल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिका प्रशासनाने मिठी नदीतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आयआयटी मुंबईमार्फत सव्रेक्षण करण्याचे ठरविले आहे.

प्रदूषणमुक्तीसाठी सव्रेक्षण
>मुंबई : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) नोटीस बजाविल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिका प्रशासनाने मिठी नदीतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आयआयटी मुंबईमार्फत सव्रेक्षण करण्याचे ठरविले आहे. मिठी नदी ते वाकोला नाला प्रदूषणमुक्त करून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यावर या अहवालातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. नदीच्या प्रवाहात स्वतंत्र मलनिस्सारण वाहिनीही टाकण्याचा विचार आहे.
एमपीसीबीने डिसेंबर 2क्13मध्ये पालिकेला नोटीस पाठवून मिठी नदीचे प्रदूषण रोखण्याची ताकीद दिली होती. त्यानुसार मुंबईतील नाल्यांच्या सव्रेक्षणामध्ये मिठी नदी आणि वाकोला नाल्याचेही सव्रेक्षण हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार मिठी नदी परिसरात सांडपाणी पुन:प्रक्रिया प्रकल्प अथवा पाणी नदीत सोडण्याआधी त्यावर अन्य ठिकाणी प्रक्रिया करणो शक्य आहे का? याची चाचपणी या सव्रेक्षणातून केली जाणार आहे.
आयआयटीने अहवाल दिल्यानंतर त्यातील शिफारशीची व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे. तसेच प्रदूषणाचे स्नेत म्हणजेच कारणोही शोधण्यात येणार आहेत. मिठी नदीमध्ये घाण पाणी कुठून शिरत आहे, यावर अभ्यास केला जाणार आहे. आठ महिन्यांत अहवाल सादर होईल, असे पालिकेतील एका अधिका:याने सांगितले. (प्रतिनिधी)
मिठी नदीतील दरुगधी आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निरी या संस्थेने 2क्क्9मध्ये
प्रयोग केला होता.
या सव्रेक्षणासाठी मुंबई महापालिकेकडून
8क् लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
ं2क्क्6मध्ये आयआयटी मुंबईने ‘मिठी’ परिसरात 37 पुन:प्रक्रिया प्रकल्पांची शिफारस केली होती.