Join us

SurJyotsna Awards 2021: उपमुख्यमंत्रीपदावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘आनंदी आनंद गडे!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 06:26 IST

SurJyotsna Awards 2021: संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास राज्यातील मान्यवर मंत्री उपस्थित होते.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आणखी एक उपमुख्यमंत्री पद निर्माण केले जाणार असून ते काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘आनंदी आनंद गडे!’ अशी सूचक प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना दिली.संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास राज्यातील मान्यवर मंत्री उपस्थित होते. या वेळी मंत्री थोरात यांना उपमुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता ते म्हणाले, राजकारणात अशा चर्चा होतच असतात. कोणतेही पद दुय्यम असते, पण जनतेच्या सेवेसाठी ते महत्त्वाचे असते. आम्ही समाधानी आहोत, असेही थोरात यांनी सांगितले.तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही उपमुख्यमंत्री पदाबाबतची चर्चा फेटाळून लावली. ते म्हणाले, राजकारणात ज्या चर्चा होतात ते प्रत्यक्षात होतेच असे नाही. उपमुख्यमंत्री पद काँग्रेसला मिळेलच असे काही नाही, अशा शब्दांत त्यांनी ही चर्चा फेटाळून लावली.

टॅग्स :बाळासाहेब थोरातसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार