सूरज एंटरप्रायजेस्ला मंचाने सुनावला दंड

By Admin | Updated: October 22, 2014 22:49 IST2014-10-22T22:49:08+5:302014-10-22T22:49:08+5:30

व्यवहार रद्द झाल्यावरही नोंदणी रक्कम परत न करता खरेदीधारकाची फसवणूक करणा-या सूरज एटंरप्रायजेसला ग्राहक मंचाने संपूर्ण रक्कम व्याजासह आणि २५ हजार नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

Suraj Enterprises Manifesto Paid | सूरज एंटरप्रायजेस्ला मंचाने सुनावला दंड

सूरज एंटरप्रायजेस्ला मंचाने सुनावला दंड

ठाणे : व्यवहार रद्द झाल्यावरही नोंदणी रक्कम परत न करता खरेदीधारकाची फसवणूक करणा-या सूरज एटंरप्रायजेसला ग्राहक मंचाने संपूर्ण रक्कम व्याजासह आणि २५ हजार नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.
डोंबिवली येथे राहणारे पंकज पाटील यांनी सूरज एंटरप्रायजेस्च्या कामोठे, नवी मुंबई येथील सुरजसारा प्रकल्पातील ५०४ क्रमांकाची सदनिका २५ लाख ६७ हजारामध्ये विकत घेण्याचे ठरविले. त्यानुसार आधी ७ लाख पाटील यांनी त्यांना दिले. त्यानंतरही बांधकाम सुरू न केल्याने ७ लाख व्याज आणि नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी केली. त्यानुसार सूरज एंटरप्रायजेस्ने ६ लाखाचे दोन धनादेश पाटील यांना दिले. परंतु ते धनादेशसुद्धा अनादरीत झाल्याने त्यांनी रोख रकमेची मागणी केली.
त्याकडेही दुर्लक्ष केल्याने अखेर पाटील यांनी एंटरप्रायजेस्च्याविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करून १२ लाख व्याजासह आणि नुकसानभरपाई म्हणून ५ लाख द्यावे,अशी मागणी केली. तर एंटरप्रायजेस्ने पाटील यांच्याशी तडजोडीची बोलणी सुरू असून काही रक्कम दिल्याचे सांगितले.
कागदपत्रे,घटनांची पडताळणी करता पाटील यांनी सदनिकेसाठी एंटरप्रायजेस्ला ७ लाख दिले होते. तर संबंधित ठिकाणी बांधकाम सुरू न झाल्याने पाटील यांच्या मागणीनुसार व्यवहार रद्द झाला आणि त्यासाठी पाटील यांना ६ लाखाचे दोन धनादेश एंटरप्रायजेस्ने दिल्याचे मंचाने स्पष्ट केले.
परंतु ते धनादेश अनादरीत झाल्यानंतरही एंटरप्रायजेस्ने त्यांना रोख रक्कम दिलेली नाही,असेही मंचाने सांगितले. त्यामुळे एंटरप्रायजेस्ने योग्य सेवा दिलेली नसून त्यांनी पाटील यांना १२ लाख आदेशापासून ६० दिवसात आणि इतर खर्च २५ हजार द्यावा,असे आदेश मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Suraj Enterprises Manifesto Paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.