Join us

सुप्रिया सुळे आल्या, काँग्रेसची अनुपस्थिती; काँग्रेस घेत आहे परिस्थितीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 07:01 IST

हिंदीभाषिक मतांचीही चिंता

मुंबई: शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार जितेंद आव्हाड आणि लहान मित्रपक्षांचे काही नेते उद्धव-राज ठाकरे यांच्या सभेला उपस्थित होते, पण करेंवेसचा एकही बड़ा नेता उपस्थित नव्हता.

शेकापचे नेते जयंत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेही हेही हजर होते. काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकरही आले होते. मुणगेकर यांची राजकीय नेत्यापेक्षा शिक्षणतज्ज्ञ अशीच प्रतिमा आहे. प्रदेश काँग्रेसचे, मुंबई काँग्रेसचे एकही बडे नेते सभेला आले नाहीत. महाविकास आघाडीतील उपस्थित सर्वांचा उल्लेख व्यासपीठावरून करण्यात आला. सभेच्या शेवटी त्यांना व्यासपीठावर बोलविण्यात आले. त्यात त्रिभाषा सूत्राला विरोध करून आंदोलनाची भूमिका अगदी सुरुवातीपासून घेणारे दीपक पवार हेही होते. त्यांचा नामोल्लेख उद्धव ठाकरे यांनी भाषणातही केला.

दोन बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी राहणार का? जवळीक कितपत पुढे जाते यावर लक्ष

मराठी-हिंदीच्या वादात न पडण्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याचे दिसले. या मुट्खावरून मुंबईत इसलेल्या आंदोलनातही काँग्रेसचे नेते सहभागी झाले नव्हते. भाजपप्रमाणेच हिंदी मतदारांतर काँग्रेसचीही मदार राहिली आहे. अशावेळी ठाकरे बंधूंच्या सभेपासून दूर राहणेच काँग्रेसने पसंत केले. शिवाय उद्धव-राज भविष्यातही एकत्र आले तर महाविकास आघाडी राहील का आणि त्यात काँग्रेस राहील का, हा विषय आता चर्चिला जात आहे. आजच्या सभेसाठी काँग्रेसच्या नेत्यांना उद्धवसेनेकडून निमंत्रित करण्यात आले होते, अशी माहिती आहे.

मराठी-हिंदीवरूनचे राजकारण, मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक आणि उद्धव-राज यांची जवळीक कितपत पुढे जाते यावर काँग्रेसचे राज्यातील आणि दिल्लीतील नेते नजर ठेवून आहेत, असे म्हटले जाते.

बिहार निवडणुकीमुळे सावध भूमिका

भाजपप्रमाणेच काँग्रेसलाही हिंदी विरोधाची भूमिका परवडणारी नाहीं अन् त्याला बिहारख्या आगामी विधानसभा निवडणुकीची किनार आहे. याचवर्षी नोव्हेंबरमध्ये बिहारमधील निवडणूक होणार आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात बिहारी समाज असा आहे की ज्याचा संबंध आजही आपल्या मूळ गावाशी आहे. सुप्रिया सुळे यांना सभेसाठी पाठवून शरद पवार यांनी ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याला एकप्रकारे पाठिंबा दिल्याचे मानले आहे. काँग्रेसने मात्र अधिकृतपणे कोणालाही न पाठवून सावध भूमिका घेतल्याचे दिसले.

 

टॅग्स :सुप्रिया सुळेराज ठाकरे