'कॅम्पा कोला'ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

By Admin | Updated: January 30, 2015 17:49 IST2015-01-30T17:49:36+5:302015-01-30T17:49:36+5:30

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या 'कॅम्पा कोला'वासियांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला आहे.

Supreme Court's relief to 'Campa Cola' | 'कॅम्पा कोला'ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

'कॅम्पा कोला'ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या 'कॅम्पा कोला'वासियांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला आहे. कॅम्पा कोलातील बेकायदा फ्लॅट्स कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार तसेच महापालिका प्रशासनाला दिल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे 'कॅम्पा कोला' वसाहतीतील १४० कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
वरळीतील कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील मिडटाऊन, ऑर्किड, शुभम अर्पाटमेंट, ईशा-एकता, पटेल, बी.वाय. अर्पाटमेंट या सात इमारतींचे एकूण ३५ मजले अनधिकृत असून त्यात १४० फ्लॅट आहेत. महापालिकेच्या फ्लॅट पाडण्याच्या कारवाईला कॅम्पा कोलावासियांनी मोठा विरोध केला होता. त्यांच्या मदतीला अनेक राजकीय पुढारीही धावून आले होते. परंतू अधिका-यांनी कायद्याचा बडगा उगारल्यानंतर कॅम्पाकोला वासियांनी कायद्याचा आधार घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. रहिवाशांनी आधी उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.

Web Title: Supreme Court's relief to 'Campa Cola'