मुंबईतील हुक्का पार्लरवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली
By Admin | Updated: December 8, 2014 17:48 IST2014-12-08T17:48:34+5:302014-12-08T17:48:34+5:30
मुंबईतील हुक्का पार्लरवर मुंबई महापालिकेने टाकलेली बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. धुम्रपानावर बंदी नसेल तर हुक्का पार्लरवर बंदी कशाला हवी असा सवालही सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे.

मुंबईतील हुक्का पार्लरवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - मुंबईतील हुक्का पार्लरवर मुंबई महापालिकेने टाकलेली बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. धुम्रपानावर बंदी नसेल तर हुक्का पार्लरवर बंदी कशाला हवी असा सवालही सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईत हुक्का पार्लर चांगलेच फोफावले असून दम मारो दम म्हणत हुक्का मारणा-या तरुणाईचे प्रमाणही वाढले होते. हुक्क्याच्या व्यसनाधीन झालेल्या मुलांमुळे पालकांची डोकेदुखी वाढली होती. तीन वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने रेस्टॉरंटमध्ये हुक्का उपलब्ध करुन देण्यास बंदी टाकली होती. या निर्णयाविरोधात मुंबईतील हुक्का पार्लर मालकांनी कोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने मुंबई महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने स्मोकिंग झोन असलेल्या रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर चालवण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले.