भरत राजपूतसह समर्थक भाजपात
By Admin | Updated: January 12, 2015 22:30 IST2015-01-12T22:30:50+5:302015-01-12T22:30:50+5:30
तालुका काँग्रेस अध्यक्ष भरत राजपूत यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज काँगे्रसला रामराम ठोकून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे एका कार्यक्रमात भाजप पक्षात प्रवेश

भरत राजपूतसह समर्थक भाजपात
डहाणू : डहाणू नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते व तालुका काँग्रेस अध्यक्ष भरत राजपूत यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज काँगे्रसला रामराम ठोकून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे एका कार्यक्रमात भाजप पक्षात प्रवेश घेतला.
त्यांच्यासह नौशीर इराणी जिल्हा उपाध्यक्ष, शहर प्रमुख वसंत कर्नावट, माजी नगरसेवक जगदीश राजपूत, माजी जि. प. सदस्य विवेक कोरे, विकास पाटील, भरत शहा, संदिप पांचाह आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश घेतला. यावेळी पालकमंत्री विष्णू सावरा, खा. चिंतामण वनगा, जिल्हा उपाध्यक्ष अमित नहार, आ. पास्कल धनारे आदी जण उपस्थित होते.
निवडणुकीच्या रणधुमाळीत भरत राजपूत समर्थकांनी मुंबई येथे घाईघाईत प्रवेश घेतला असला तरी डहाणू येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम घेण्यात येणार असून यावेळी उर्वरीत पंचायत समिती सदस्य, बँक संचालक, नगरसेवक, सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे भाजप प्रदेश कमीटीच्या सूत्रांकडून सांगितले. (वार्ताहर)