छत्रपती संभाजीनगरमधील महिला उद्योजिकांना 'आई' पर्यटन धोरणाचे पाठबळ

By स्नेहा मोरे | Updated: November 29, 2023 19:04 IST2023-11-29T19:03:43+5:302023-11-29T19:04:04+5:30

राज्यातून या योजनेसाठी छत्रपती संभाजी नगर येथील महिला उद्योजिकांनी अधिक प्रस्ताव आले आहेत.

Support of aai tourism policy to women entrepreneurs in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमधील महिला उद्योजिकांना 'आई' पर्यटन धोरणाचे पाठबळ

छत्रपती संभाजीनगरमधील महिला उद्योजिकांना 'आई' पर्यटन धोरणाचे पाठबळ

मुंबई - पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने आई पर्यटन धोरणाचा अवलंब केला आहे. यानुसार, महिला उद्योजिकांना विशेष सवलत देऊन प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातील महिला उद्योजिकांना पर्यटन विभागाने आवाहन केले आहे, त्यात आता छत्रपती संभाजी नगर येथील महिला उद्योजिकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला आहे.

राज्यातून या योजनेसाठी छत्रपती संभाजी नगर येथील महिला उद्योजिकांनी अधिक प्रस्ताव आले आहेत. त्याखालोखाल, पुणे, कोकण विभागातून प्रतिसाद मिळत आहे. महिलांना मिळणारे आर्थिक स्वातंत्र्य, गतिशीलता, त्यांचा उत्साह, महत्वाकांक्षा आणि निर्णयक्षमतेचा फायदा घेत राज्यात दर्जेदार पर्यटनाला चालना देणे, तसेच महिलांसाठी वैविध्यपूर्ण आणि शाश्वत आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणे हे 'आई' या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. तसेच, याव्दारे महिलांना सुरक्षित, परवडणारी, शाश्वत आणि समृध्द पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ सारख्या संस्था बरोबर भागीदारी करण्यात आली आहे. एमएसआरएलएम, माविम आणि इतर संस्थांच्या सहाय्याने स्थापन झालेल्या महिलांच्या गटांच्या सहभागाने पर्यटनस्थळी लँडस्केप डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट, वारसा स्थळे आणि नैसर्गिक स्थळे जतन करणे, रिसॉर्ट्समधील सुविधा व्यवस्थापन इ. सेवांसाठी महिला नेतृत्वात उपक्रमांना प्राधान्य देण्यात येईल. हे धोरण यशस्वी होण्यासाठी आणि महिलांना पर्यटन व्यवसायासाठी पुरेसा वित्तपुरवठ्याची हमी मिळावी याकरीता सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका व इतर वित्तीय संस्थांच्या सहकार्याने योजना राबिवण्यात येत आहे.

रोजगाराच्या संधींचा विस्तार करण्याचा प्रयत्न
धोरणांतर्गत राज्यातील महिला पर्यटकांना सुरक्षित वातावरणात बहाल करण्यासोबतच पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रस्तावित धोरणात नमूद आहे. त्यामुळे राज्यभरातील महिला उद्योजिकांना यासाठी पुढाकार घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरुन पर्यटन क्षेत्रात भविष्यात महिला उद्योजिका अग्रेसर असतील. - रविंद्र पवार, सहाय्यक संचालक, पर्यटन संचालनालय

Web Title: Support of aai tourism policy to women entrepreneurs in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.