पुरवणी यादीत वाढली १ हजार १४९ अधिक मते
By Admin | Updated: October 10, 2014 23:35 IST2014-10-10T23:35:13+5:302014-10-10T23:35:13+5:30
विधानसभेसाठी नव्याने नोंदविण्यात आलेल्या मतदारांच्या पुरवणी यादीत शहापूर तालुक्यात १ हजार १४९ मतदारांची वाढ झाली आहे.

पुरवणी यादीत वाढली १ हजार १४९ अधिक मते
भातसानगर : विधानसभेसाठी नव्याने नोंदविण्यात आलेल्या मतदारांच्या पुरवणी यादीत शहापूर तालुक्यात १ हजार १४९ मतदारांची वाढ झाली आहे. आता एकूण मतदारांची संख्या २ लाख ३५ हजार २७४ झाली आहे.
निवडणूक आयोगाने मतदारांची नावे नोंदण्यासाठी वारंवार मुदत वाढवून दिल्याने तालुक्यात अनेक तरुण तरूणींनी नावे नोंदविली आहेत. पुरवणी यादी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये १ हजार १४९ नव्या मतदारांची नावे नोंदविली आहेत. त्यामुळे आता मतदारांची संख्या २ लाख ३५ हजार २७४ इतकी झाली आहे. या यादीत दोनदा आलेल्या नावांविषयी सहाय्यक निवडणूक अधिकारी अविनाश कोष्टी यांना विचारले असता ती चूक त्या मतदारांची असून त्याने दोन अर्ज दाखल केल्याने त्याचे पुन्हा नाव आले आहे. मात्र कागदोपत्री पूर्तता असताना कुणीही मतदानापासून वंचित राहू नये याची काळजी आम्ही घेतली असल्याचे सांगितले.
कागदोपत्री पुरावा म्हणजेच शाळेचा दाखला नसणे, रेशनिंग कार्डवर नाव नसणे या कारणांमुळे शेकडो मतदार आज मतदानापासून वंचित असून अनेकांची हयात संपत आली मात्र त्यांची नावे मतदार यादीत कधी नोंदली गेलीच नाहीत. (वार्ताहर)