पुरवणी लेख...... -आ.वैभवराव पिचड, विधानसभा सदस्य ...........3
By Admin | Updated: March 23, 2017 17:15 IST2017-03-23T17:15:41+5:302017-03-23T17:15:41+5:30
तालुक्याचा अधिकाधिक विकास व्हावा हीच अपेक्षा असून अनेक योजना पूर्ण करावयाच्या आहेत. त्यात प्रामुख्याने रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी तरुणांना उपलब्ध करुन देणे,पर्यटन विकासासाठी कामे करणे, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व संस्कृतीच्या खुणा अंगी बाळगणार्या तालुक्यातील सर्व गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करणे. कोल्हार घोटी रस्त्याचे चौपदरीकरण करुन विविध रस्त्यांची कामे मार्गी लावणे, निळवंडे उच्चस्तरीय कालवे पूर्ण करणे, प्रवरा नदीपात्रात प्रोफाईल वॉल बांधणे, निळवंडे जलाशयातील पिंपरणे येथील उड्डाण पुलाचे काम पूर्ण करणे, कोकणात वाहून जाणारे पाणी मुळा, प्रवरा खोर्यात वळविणे, तालुक्यातील तीर्थ क्षेत्रांचा विकास करणे, तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करणे, तालुक्यात उच्च व तंत्रशिक्षणाच्या अधिक सुविधा निर्माण करुन देणे, तालुक्यातील प्रत्येक शाळा डिजिटल बनविणे, तालुक्यात राज्य व राष्

पुरवणी लेख...... -आ.वैभवराव पिचड, विधानसभा सदस्य ...........3
त लुक्याचा अधिकाधिक विकास व्हावा हीच अपेक्षा असून अनेक योजना पूर्ण करावयाच्या आहेत. त्यात प्रामुख्याने रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी तरुणांना उपलब्ध करुन देणे,पर्यटन विकासासाठी कामे करणे, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व संस्कृतीच्या खुणा अंगी बाळगणार्या तालुक्यातील सर्व गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करणे. कोल्हार घोटी रस्त्याचे चौपदरीकरण करुन विविध रस्त्यांची कामे मार्गी लावणे, निळवंडे उच्चस्तरीय कालवे पूर्ण करणे, प्रवरा नदीपात्रात प्रोफाईल वॉल बांधणे, निळवंडे जलाशयातील पिंपरणे येथील उड्डाण पुलाचे काम पूर्ण करणे, कोकणात वाहून जाणारे पाणी मुळा, प्रवरा खोर्यात वळविणे, तालुक्यातील तीर्थ क्षेत्रांचा विकास करणे, तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करणे, तालुक्यात उच्च व तंत्रशिक्षणाच्या अधिक सुविधा निर्माण करुन देणे, तालुक्यातील प्रत्येक शाळा डिजिटल बनविणे, तालुक्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावे यासाठी क्रीडा सुविधांचा विकास करणे, तालुक्यातील प्रत्येक शाळा डिजिटल बनविणे, कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करणे, अकोल्यात सुसज्ज नाट्यगृह निर्माण करणे आदि योजनांचा समावेश आहे.तसेच अकोले तालुका व्यसनमुक्त करण्याचे माझे स्वप्न असून त्यासाठी तालुक्यात दारुबंदी व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम व गतिमान बनावे तसेच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चांगली रहावी असा माझा प्रयत्न असेल. तालुक्यातील सहकारी संस्था अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सुजलाम् सुफलाम् समृध्द अकोले तालुक्याच्या निर्मितीचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी गरज आहे ती आपल्या सहकार्याची, प्रेमाची, विचारांची, आशीर्वादाची, सक्रिय सहभागाची आणि हे असेल तर कोणतीही ताकद आपल्याला विकासापासून रोखू शकणार नाही. -आ.वैभवराव पिचड, विधानसभा सदस्य