सुपरस्टार रजनीकांत ट्विटरवर
By Admin | Updated: May 6, 2014 11:37 IST2014-05-06T11:08:19+5:302014-05-06T11:37:11+5:30
आपल्या अभिनयाने देशालाच नव्हे तर जगाला भुरळ पाडणार्या ‘सुपरस्टार’ अभिनेता रजनीकांतने ट्विटर विश्वात पाऊल टाकले आहे.

सुपरस्टार रजनीकांत ट्विटरवर
मुंबई : आपल्या अभिनयाने देशालाच नव्हे तर जगाला भुरळ पाडणार्या ‘सुपरस्टार’ अभिनेता रजनीकांतने ट्विटर विश्वात पाऊल टाकले आहे. अभिनेता रजनीकांतने सोशल नेटवर्किंग साइट्स असलेल्या ट्विटरवर अकाउंट उघडून आपल्या लोकप्रियतेचा पुन्हा एकदा जणू दाखलाच दिला आहे.
पहिल्याच दिवशी ट्विटरवर अभिनेता रजनीकांत यांच्या फॉलोअर्सची संख्या १ लाख २५ हजारांवर पोहोचली आहे. सोमवारी दुपारी ट्विटरवर अकाउंट उघडल्यानंतर १५ मिनिटांतच १५ हजारांहून अधिक फॉलोअर्स रजनीकांतशी जोडले गेले. मात्र या सुपरस्टारने अजूनही कोणाला फॉलो केलेले नाही.