एमआयडीसीच्या जागेवरील अतिक्र मणाला ‘आशिर्वाद’
By Admin | Updated: May 13, 2015 00:26 IST2015-05-13T00:26:33+5:302015-05-13T00:26:33+5:30
हनुमाननगर येथे मुस्लीम कब्रस्थानच्या बाजूला एमआयडीसीच्या जागेवर अतिक्र मण सुरु असून ते न काढण्यासाठी राजकीय दबाव

एमआयडीसीच्या जागेवरील अतिक्र मणाला ‘आशिर्वाद’
घोडबंदर : हनुमाननगर येथे मुस्लीम कब्रस्थानच्या बाजूला एमआयडीसीच्या जागेवर अतिक्र मण सुरु असून ते न काढण्यासाठी राजकीय दबाव येत असल्यामुळे अधिकारी कारवाई करण्यास कचरत असल्याचा आरोप होत आहे. बसपा, सपा या राजकीय पक्षांसह शिवसैनिकांनी तक्रारी केल्या असल्या तरी सर्व तक्रारींकडे ठाणे महापालिका आणि एमआयडीसी डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.
मुस्लीम धर्मियांना वागळे विभागात दफनभूमी नसल्याने या समाजाने दफन भूमीची मागणी केली होती.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे कब्रस्थान बांधून दिले आहे. या कब्रस्थानच्या लगत एमआयडीसीची रिक्त जागा आहे, त्या जागेवर अनेकांचा डोळा असल्याने या जागेवर कब्जा सुरु आहे. शिवसेना नगरसेवकाच्या जवळच्या नातेवाईकाने एका जागेवर पत्र्याच्या खोल्या आणि कब्रस्थानच्या बाजूला मोठे अतिक्र मण करून गाळा बांधला असल्याची माहिती शिवसैनिक बबलू शेख याने दिली. याबाबत तक्रार केली मात्र कोणीही कारवाई करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. बसपाचे नगरसेवक विलास कांबळे आणि समाजवादी पक्षाचे पदाधिकारी यांनी देखील या अतिक्र मणाची तक्र ार केली आहे.या अतिक्र मणास पालिकेचे अधिकारी आण िएमआयडीसी पाठीशी घालत असल्यामुळे या अधिकार्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)