राजभवनातील सूर्योदय गॅलरी जनतेसाठी खुली होणार

By Admin | Updated: August 22, 2015 01:39 IST2015-08-22T01:39:03+5:302015-08-22T01:39:03+5:30

मलबार हिल येथे समुद्रकिनारी वसलेल्या ऐतिहासिक राजभवनाला भेट देणे आता शक्य होणार असून, राजभवनातून आता सर्वसामान्य नागरिकांना सूर्योदयही पाहता

The sunrise gallery of the Raj Bhavana will be open to the public | राजभवनातील सूर्योदय गॅलरी जनतेसाठी खुली होणार

राजभवनातील सूर्योदय गॅलरी जनतेसाठी खुली होणार

मुंबई : मलबार हिल येथे समुद्रकिनारी वसलेल्या ऐतिहासिक राजभवनाला भेट देणे आता शक्य होणार असून, राजभवनातून आता सर्वसामान्य नागरिकांना सूर्योदयही पाहता येणार आहे. राजभवनातील ‘सूर्योदय गॅलरी’ तसेच येथील ‘देवी मंदिर’ ही दोन स्थळे
१ सप्टेंबरपासून जनतेसाठी खुली करण्यात येणार असल्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे.
स्टेट बँकेच्या सहकार्याने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने राजभवनासाठी तयार केलेल्या १ं्नुँं५ंल्ल-ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या आॅनलाइन नोंदणी प्रणालीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाले. या वेळी त्यांनी ही घोषणा केली. सुरक्षेच्या कारणास्तव राजभवनाला भेट देण्यासाठी नोंदणी प्रणालीवर प्रवेशपूर्व नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. मंगळवार ते रविवार या दिवशी सकाळी ६.१५ ते ८ या दोन तासांकरिता प्रवेश देण्यात येणार आहे. एका दिवशी केवळ दहा लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी प्रत्येकी पंचवीस रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. राजभवनाच्या वतीने नोंदणी केलेल्या नागरिकांना ई-मेल व एसएमएसद्वारे तारीख व वेळेबाबत सूचित केले जाईल. सकाळी ६ वाजता राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा तपासणीसाठी संबंधितांना उपस्थित
राहणे आवश्यक राहणार असून, सोबत ओळखपत्र बाळगणे बंधनकारक असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The sunrise gallery of the Raj Bhavana will be open to the public