सूरमयी दिवाळी पहाट

By Admin | Updated: October 23, 2014 23:35 IST2014-10-23T23:35:49+5:302014-10-23T23:35:49+5:30

क्रांतिकारक चळवळी हा इतिहासाची साक्ष देणारा पेणचा विनायकराव कोल्हटकर वाडा आज दीपावली सूरमयी पहाटेने पुन्हा जागा झाला.

The sunny day of Diwali | सूरमयी दिवाळी पहाट

सूरमयी दिवाळी पहाट

पेण : पेणचा कोल्हटकर चिरेबंदी वाडा, स्वातंत्र्य आंदोलनाची खलबते, देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी रचलेल्या क्रांतिकारक चळवळी हा इतिहासाची साक्ष देणारा पेणचा विनायकराव कोल्हटकर वाडा आज दीपावली सूरमयी पहाटेने पुन्हा जागा झाला. निमित्त होते दिवाळी पहाटेचे. घनश्याम सुंदरा... श्रीधरा या भूपाळीने प्रारंभ होताच दीपज्योतीने लखलखलेल्या कोल्हटकर वाडा जागा झाला होता. गायक संतोष पाटील व गितिका मांजरेकर यांच्या सुरांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
माझे माहेर पंढरी ही संतोष पाटील यांच्या पहाडी आवाजात अभंग, विकत घेतला शाम हे जगाच्या पाठीवर चित्रपटातलं भावगीताने गितिका मांजरेकर यांनी कार्यक्रमाची लज्जत वाढविली. त्यानंतर मानसीचा चित्रकार तू .... या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.... कान्होबा तुझी घोंगडी रेशमाच्या रेघांनी लावणी आणि माझ्या घरी दिवाळी या सुरेल गीतांनी वन्समोअर परमार्फन्स झाला. त्यानंतर मला लागले वेड प्रेमाचे हे तरुणाईचे गाणे अशा एकापेक्षा एक मराइी गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.
तब्बल तीन तासांची ही सुरेख मैफिलिचा पेणकरांनी मनमुराद आनंद घेतला. त्यामध्ये अंबरिश रिसबूड, हार्मोनियम कुशल, ड्रम सूर्यकांत गायकर, ढोलकी सचिन पवार, मृदुंग बळ्ळाळ ढोले व साथकरी यांनी मैफील सजविली.

Web Title: The sunny day of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.