सुनील तटकरेंचा षष्ठ्यब्दीपूर्तीचा सोहळा रद्द

By Admin | Updated: July 6, 2015 02:14 IST2015-07-06T02:14:40+5:302015-07-06T02:14:40+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांच्या इच्छेप्रमाणे प्रांतिक कार्यालयाकडून प्रांताध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा कोलाड येथे संपन्न होणार होता.

Sunil Tatkare's centenary celebrations canceled | सुनील तटकरेंचा षष्ठ्यब्दीपूर्तीचा सोहळा रद्द

सुनील तटकरेंचा षष्ठ्यब्दीपूर्तीचा सोहळा रद्द

पाली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांच्या इच्छेप्रमाणे प्रांतिक कार्यालयाकडून प्रांताध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा कोलाड येथे संपन्न होणार होता. परंतु राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे या कालावधीत उपलब्ध नसल्यामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला असला तरी वाढदिवस हा घरगुती वातावरणात सुतारवाडी येथील गीताबाग येथे दरवर्षीप्रमाणे साजरा होणारच असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल यांनी के ले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची चौकशी होत असताना आमदार तटकरे यांच्या चौकशीची शक्यता असल्याने हा सोहळा रद्द करण्यात आला, असा रंग काही राजकीय व्यक्ती देत असल्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव ओसवाल बोलत होते. आमदार तटकरे यांची चौकशी व अन्य बाबी न्यायप्रविष्ठ आहेत. त्याचा साठीचा सोहळा रद्द होण्याशी काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. १0 जुलै रोजी घरगुती वातावरणात वाढदिवस होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Sunil Tatkare's centenary celebrations canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.