सुनील जोशी प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी
By Admin | Updated: December 19, 2014 23:11 IST2014-12-19T23:11:16+5:302014-12-19T23:11:16+5:30
वादग्रस्त सुनील जोशी प्रकरण आता अधिवेशनात पोहोचले असून कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांची यासंदर्भातील लक्षवेधी सूचना

सुनील जोशी प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी
कल्याण : वादग्रस्त सुनील जोशी प्रकरण आता अधिवेशनात पोहोचले असून कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांची यासंदर्भातील लक्षवेधी सूचना विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी पटलावर दाखल करून घेतली आहे. तिच्यावर सोमवारी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
लाचखोरीच्या आरोपाखाली निलंबित कार्यकारी अभियंता जोशी याला एका शासन निर्णयानुसार महापालिका सेवेत दाखल करून घेण्याचा आयुक्त रामनाथ सोनवणेंचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. नोव्हेंबर मध्ये झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोशी प्रकरणात बाळगलेले मौन पाहता त्यांचेही जोशीला अभय असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान आमदार पवार यांनी जोशी प्रकरणी लक्षवेधीद्वारे शासन आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. लाचखोर अधिकाऱ्याला सेवेत पुन्हा रूजू करू न घेतल्याबद्दल नागरीकांमध्ये संतापाची भावना असून याप्रकरणी शासनाने लक्ष घालावे असे पवारांनी लक्षवेधी सूचनेत नमूद केले आहे. (प्रतिनिधी)