दहिसरमध्ये सुनेवर बलात्कार
By Admin | Updated: September 14, 2014 01:08 IST2014-09-14T01:08:49+5:302014-09-14T01:08:49+5:30
सास:याने सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दहिसरमधील केतकीपाडा येथे घडली़.

दहिसरमध्ये सुनेवर बलात्कार
सासरा पसार
मुंबई : सास:याने सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दहिसरमधील केतकीपाडा येथे घडली़. पीडित 19वर्षीय तरुणी नुकतीच बुलडाण्याहून मुंबईत आली होती़ पती व सास:यासोबत ती महिन्याभरापासून राहत होती.या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तिचा पती बिगारीचे काम करतो़ बुधवारी तिचा पती कामाला गेल्याची संधी साधून सास:याने हे कृत्य केल़े तसेच कोणालाही याबाबत सांगितल्यास जीवे मारेन अशी धमकीही दिली़ तरीही तिने
घडलेला प्रकार पतीला सांगितला़ अखेर या दोघांनीही पोलीस
ठाण्यात तक्रार केली़ दरम्यान सासरा पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ (प्रतिनिधी)