नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची रविवारी स्वच्छता मोहीम
By Admin | Updated: November 15, 2014 02:22 IST2014-11-15T02:22:46+5:302014-11-15T02:22:46+5:30
रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र राज्याबाहेर जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम रविवार, 16 नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची रविवारी स्वच्छता मोहीम
अलिबाग : रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र राज्याबाहेर जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम रविवार, 16 नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. ही स्वच्छता मोहीम, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’चे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ.o्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम विद्यासागर राव या वेळी उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील स्वच्छता अभियानाला सायन रेल्वे स्टेशनसमोरील संत रोहिदास मार्ग (धारावी) येथून सकाळी 1क्.55 वाजता सुरुवात होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र राज्याबाहेर होणा:या या स्वच्छता मोहिमेंतर्गत सुमारे 77 शहरांतील 4 हजार 44क् कि.मी. लांबीच्या
रस्त्यांचा, पोलीस ठाणो, सरकारी कार्यालये, सरकारी मुख्यालय, बस स्थानके, समुद्रकिनारे येथे स्वच्छता
करण्यात येणार आहे.
1,3क्,क्क्क् स्वयंसेवकांचा समावेश असलेली मानवी साखळी हे स्वच्छता
अभियान यशस्वीपणो पार पाडणार आहे. हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उरलण्याचे साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरविण्यात येणार आहे. जमा केलेला कचरा सरकारी अथवा खासगी वाहनांतून डम्पिंग ग्राउंडर्पयत पोहोचविण्यात येणार आहे.
या अभियानासाठी प्रतिष्ठानतर्फे सर्व ठिकाणी संबंधित अधिका:यांना सहकार्याबाबत विनंतीपत्रे
दिलेली असून, या सर्वच
ठिकाणी लाभलेला अधिकारी वर्गाचा सहभाग आणि सहकार्याबाबतची तयारी फारच उत्साहवर्धक असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कच:यामुळे सर्वत्र दरुगधी तर पसरतेच पण त्याचबरोबर विषमज्वर, मलेरिया, डेंग्यु, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे साथीचे रोग पसरण्याचा धोकादेखील असतो. याशिवाय आपल्या शहराची ओळख एक अस्वच्छ आणि गचाळ शहर म्हणून होते ती वेगळीच. परंतु समाज एक कुटुंबच आहे आणि मीही त्यापैकीच एक असून, मलाही सामाजिक कर्तव्ये आहेत याची जाणीव प्रत्येक नागरिकाला होणो गरजेचे आहे. या एकात्मतेच्या भावनेतून स्वयंशिस्त अंगीकारल्यास भारत सर्वात स्वच्छ देश म्हणून ओळखला जाईल.- डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी