रविवार होणार ब्लॉक

By Admin | Updated: March 7, 2015 22:35 IST2015-03-07T22:35:34+5:302015-03-07T22:35:34+5:30

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गासह हार्बरच्या पनवेल-नेरुळ स्थानकांदरम्यान अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Sunday will block blocks | रविवार होणार ब्लॉक

रविवार होणार ब्लॉक

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गासह हार्बरच्या पनवेल-नेरुळ स्थानकांदरम्यान अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक अनुक्रमे स.१०.४५ ते दु. ३.१५ आणि स. ११ ते दु. ३ या कालावधीत असतील. मुख्य मार्गावरील ब्लॉकमुळे माटुंगा-मुलुंड जलदच्या गाड्या डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून ठाणे स्थानकानंतर त्या पुन्हा जलद मार्गे पुढे धावतील.
हार्बरच्या पनवेल-नेरूळ मार्गावर ब्लॉक असल्याने सीएसटीहून पनवेलच्या दिशेने आणि तेथून सीएसटीच्या दिशेने धावणा-या लोकल नेरुळ-पनवेल स्थानकांदरम्यान रद्द करण्यात येणार आहेत. त्याच कालावधीत ठाणे-पनवेलची वाहतूकदेखील वरील स्थानकांदरम्यान रद्द करण्यात येणार आहे. त्या कालावधीत सीएसटी - नेरुळ तसेच ट्रान्स हार्बरच्या ठाणे - नेरुळ स्थानकांदरम्यान विशेष लोकल धावतील असे म.रेच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच पनवेल-अंधेरी मार्गावरील दुतर्फा वाहतूक ब्लॉकच्या कालावधीत रद्द असेल असेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Sunday will block blocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.