सॅटीसच्या छपराला रविवारचा मुहूर्त

By Admin | Updated: July 26, 2014 01:57 IST2014-07-26T01:57:01+5:302014-07-26T01:57:01+5:30

सॅटीस पुलावर ऊन-पावसात तासन्तास ताटकळत बसेसची वाट पाहत राहणा:या प्रवाशांना आता येत्या काही महिन्यांत निवारा मिळणार आहे.

Sunday muert | सॅटीसच्या छपराला रविवारचा मुहूर्त

सॅटीसच्या छपराला रविवारचा मुहूर्त

ठाणो : सॅटीस पुलावर ऊन-पावसात तासन्तास ताटकळत बसेसची वाट पाहत राहणा:या प्रवाशांना आता येत्या काही महिन्यांत निवारा मिळणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून सॅटीसवर छत बसविण्याच्या कामाचा नारळ रविवारी फुटणार आहे. यानिमित्ताने एरव्ही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे शहरातील महायुती आणि लोकशाही आघाडीचे नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रथमच एकत्रित येणार आहेत़ अशा पद्धतीने श्रेयासाठी एका व्यासपीठावर येणा:या या स्वार्थी पुढा:यांचे पितळही नारळासोबत फुटणार आह़े
ठाणोकरांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी, यासाठी ठाणो महापालिकेने सॅटीस उभारला. यावर ठाणो परिवहन सेवेचे विविध मार्गावर धावणा:या बसेसचे थांबे आहेत. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून या थांब्यांवर बसेसची वाट पाहणा:या प्रवाशांना ऊन-पावसाचा मारा सहन करावा लागत होता. महापालिकेने या सॅटीसवर छत उभारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हे छत कसे उभारावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. अखेर याचा अभ्यास झाल्यानंतर महापालिकेने याचे एक संकल्पचित्र तयार केले. विशेष म्हणजे प्रथमच सॅटीसच्या कॉनकोर्स एरिया व सॅटीस डेकवर अत्याधुनिक स्वरूपाचे फायबर वापरून छत उभारले जाणार आहे.  यासाठी 12 कोटी 68 लाख 7क् हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील 7 कोटी 77 लाख 8क् हजार रुपयांचा वाटा महापालिका उचलणार आहे. 
या कामाचा शुभारंभासाठी 27 जुलै रोजी सायंकाळी 4.3क् वाजता ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री गणोश नाईक यांच्यासह  विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, महापौर हरिश्चंद्र पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री राजेंद्र गावित, निरंजन डावखरे, शिवसेना ठाणो जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक ही नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर मिरवणार आहेत़ (प्रतिनिधी)
 
च्छत टाकण्याबरोबरच सॅटीसवर वयोवृद्ध व अपंग नागरिकांना सहजरीत्या जाता यावे यासाठी येथे आता लिफ्टची सुविधा महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. सोमवारी होणा:या स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी येणार असून, यासाठी 47 लाख 49 हजार 3क्2 रुपयांचा खर्च केला जाणार आहे. अपंग कल्याण योजनेतून या कामाचा खर्च केला जाणार आहे. 

 

Web Title: Sunday muert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.