Sunday midnight megablock | रविवारी दिवसा नाही, मध्यरात्री मेगाब्लॉक

रविवारी दिवसा नाही, मध्यरात्री मेगाब्लॉक


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर  मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. रविवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार असून, दिवसा मेगाब्लॉक नसणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप व डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील. 
या सेवा मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार   स्थानकावर थांबणार नाहीत व विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.
घाटकोपर येथून सकाळी १०.४० पासून दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड व मशीद या स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉककाळात मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार येथे सेवा उपलब्ध होणार नाहीत.

हार्बर मार्गावर कुर्ला - वाशी अप व डाउन हार्बर मार्गदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ दरम्यान सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉककाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी - पनवेल विभागादरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० पर्यंत ब्लॉक कालावधीत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sunday midnight megablock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.