Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 02:55 IST

पनवेल- वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ दरम्यान (नेरूळ / बेलापूर-खारकोपर हार्बर मार्गावरील समावेशासह) मेगाब्लॉक असणार आहे.

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर  रविवारी २८ मार्च रोजी देखभाल दुरुस्तीसाठी  मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पनवेल- वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ दरम्यान (नेरूळ / बेलापूर-खारकोपर हार्बर मार्गावरील समावेशासह) मेगाब्लॉक असणार आहे. अपहार्बर मार्गावर  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरिता पनवेलहून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत  सुटणाऱ्या  व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ पर्यंत पनवेल / बेलापूरला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा  रद्द राहतील. पनवेलहून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाणेकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावर आणि ठाणेहून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉककाळात प्रवाशांच्या सोयीकरिता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई - वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉकच्या कालावधीत ठाणे-वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.

टॅग्स :रेल्वेमुंबई लोकल