Join us

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 03:38 IST

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येईल.मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी ३ पर्यंत ब्लॉक असेल. यादरम्यान सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान धिम्या मार्गावर धावतील. माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान त्या सर्व स्थानकांवर थांबविण्यात येतील.हार्बरवर कुर्ला ते वाशीदरम्यान दोन्ही दिशेकडे सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत तर, सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ पर्यंत सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी १०.२१ ते दुपारी ३ पर्यंत पनवेल/ बेलापूर/वाशीहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी, वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन जम्बो ब्लॉकबोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान २८ सप्टेंबर (शनिवारी) रोजी रात्री ११.३० पासून ते २९ सप्टेंबर (रविवारी) पहाटे ३.३० पर्यंत चर्चगेट दिशेकडे जाणाºया जलद मार्गावर ब्लॉक असेल. तर, २९ सप्टेंबरला रात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत बोरीवली ते भार्इंदरदरम्यान विरार दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक असेल. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर २९ सप्टेंबर (रविवारी) दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.

टॅग्स :पश्चिम रेल्वेहार्बर रेल्वेमध्य रेल्वे