प्रताप सरनाईक यांना समन्स, विहंगची गैरहजेरी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST2020-12-02T04:08:30+5:302020-12-02T04:08:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स बजाविण्यात आले असून, गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास ...

Summons to Pratap Saranaik, Vihang's absence maintained | प्रताप सरनाईक यांना समन्स, विहंगची गैरहजेरी कायम

प्रताप सरनाईक यांना समन्स, विहंगची गैरहजेरी कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स बजाविण्यात आले असून, गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले. तर त्यांचा मुलगा विहंग सरनाईक मंगळवारीही चौकशीसाठी गैरहजर होता.

एमएमआरडीएच्या सुरक्षारक्षक घोटाळ्याप्रकरणी टॉप्स ग्रुप आणि विहंग ग्रुप यांच्यातील आर्थिक व्यवहाराच्या तपासणीसाठी ईडीकडून विहंग सरनाईक यांना चार वेळा समन्स बजाविण्यात आले. मात्र ते चौकशीला गैरहजर राहिले. मंगळवारीही त्यांची गैरहजेरी कायम होती. तर, शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी ते विलगीकरणात असल्याने पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची मागणी केली होती. आता त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपत असल्याने, त्यांना पुन्हा समन्स बजाविण्यात आले असून गुरुवारी चौकशीस हजर राहावे लागेल.

............................

Web Title: Summons to Pratap Saranaik, Vihang's absence maintained