आमदारांना समन्स : आज सुनावणी
By Admin | Updated: March 30, 2015 00:15 IST2015-03-30T00:15:15+5:302015-03-30T00:15:15+5:30
: डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना ३० मार्चला हजर राहण्याचे समन्स कल्याण प्रथम वर्ग न्यायालयाने बजावले आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रात चव्हाण यांनी

आमदारांना समन्स : आज सुनावणी
कल्याण : डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना ३० मार्चला हजर राहण्याचे समन्स कल्याण प्रथम वर्ग न्यायालयाने बजावले आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रात चव्हाण यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपविल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश पौळकर याने न्यायालयात केली आहे. यावर हे समन्स बजावण्यात आले आहे.
पौळकर यांनी आमदार चव्हाण यांच्यासह अन्य काही जणांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून शपथपत्र दाखल करताना मात्र या गुन्ह्याची माहिती चव्हाण यांनी दडविल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम देशपांडे आणि रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांच्याकडे त्यांनी तक्रार केली होती. परंतु, कारवाई न केल्याचा आरोप करीत पौळकर यांनी कल्याण प्रथम वर्ग तिसरे न्यायालय येथे अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, या आरोपांप्रकरणी आमदार चव्हाण यांनी ३० मार्चला न्यायालयात हजर राहून उत्तर द्यावे, असे समन्स न्यायालयाकडून बजावण्यात आले आहे. हे समन्स रामनगर पोलिसांना पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)