Join us  

आला उन्हाळा त्वचा सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 9:33 AM

उन्हाळा म्हणजे परीक्षेनंतरच्या सुट्ट्यांचा, लग्नसमारंभाचा मोसम. त्यामुळे उन्हाळ्यात या ना त्या कारणाने फिरणे होतच असते. त्यामुळे प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेवर चट्टे-व्रण उठणे, अशा त्वचाविकारांना आपल्याला सामोरे जावे लागते.

डॉ . दीपक कुलकर्णी/मुंबई - उन्हाळा म्हणजे परीक्षेनंतरच्या सुट्ट्यांचा, लग्नसमारंभाचा मोसम. त्यामुळे उन्हाळ्यात या ना त्या कारणाने फिरणे होतच असते. त्यामुळे प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेवर चट्टे-व्रण उठणे, अशा त्वचाविकारांना आपल्याला सामोरे जावे लागते. मात्र, या काळात आपण आपल्या तब्येतीची, विशेष करून आपल्या त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास, उन्हाळ्यातल्या सुट्ट्यांचा आनंद मनमुरादपणे लुटू शकतो, हे नक्की, पण त्या आधी उन्हाचे त्वचेवर कशा प्रकारे परिणाम होतात, हे आपण पाहू यात...

अतिनील किरणांचे त्वचेवर होणारे परिणामउन्हातील अतिनील म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेचे सर्वात जास्त नुकसान होते. त्वचेमधील मेलॅनिन नावाचे द्र्रव्य (ज्या द्र्रव्यामुळे त्वचा काळी दिसते) अतिनील किरणांच्या दुष्परिणामाविरुद्ध झगडत असते. त्यामुळे गोऱ्या वर्णाच्या व्यक्तींना उन्हाचा त्रास जास्त जाणवतो. उन्हात गेल्यावर त्वचेमध्ये अधिक प्रमाणात मेलॅनिन आपोआप तयार होते. अतिनील किरणांचे ए, बी आणि सी असे तीन प्रकार असतात. (उन्हातील सी प्रकारचे अतिनील किरण पृथ्वीवर पोहोचत नाहीत.) बी प्रकारच्या अतिनील किरणांमुळे त्वचा काळी पडते.तरुणपणी आपल्या त्वचेवर सुरकुत्या नसतात. कारण त्वचेमध्ये असणाºया कोलॅजेन तंतुंमुळे आपली त्वचा लवचिक होते व ताणून ठेवली जाते, पण अतिनील किरणांमुळे या तंतुंवर असणारे इलास्टिन नावाचे आवरण नष्ट होते व कोलॅजेन तंतू विस्कटतात. यामुळे त्वचा सैल पडते व सुरकुत्या पडायला प्रारंभ होतो. त्यामुळे सतत उन्हात राहणाºया व्यक्तींमध्ये सुरकुत्या लवकर चालू होतात व तारुण्यपूर्ण त्वचेचा -हास होतो. याला वैद्यकशास्त्रात फोटोएजिंग म्हणतात.

घामाचा प्रादुर्भाव व घामोळ्या : उन्हामुळे प्रमाणाबाहेर घाम आल्यास, घामातील खारट द्रवामुळे घर्मग्रंथींची नलिका सुजते व त्यातून होणारा घामाचा प्रवाह बंद होतो. त्यामुळे साठून राहणाºया घामाचा दबाव वाढून ग्रंथी फुटतात व त्यातून घामोळे तयार होते.

लग्नसमारंभात ‘मेकअप’ करताना सावधानमेकअपमुळे चेहरा तात्पुरता मोहक दिसत असला, तरी उन्हाळ्यात मेकअप करताना सावधान राहा. कारण फेशिअलमुळे मुरमे येण्याची शक्यता असते. विशेषत: स्त्रियांनी पाळीपूर्वीच्या आठवड्यात फेशिअल केल्यास हा धोका अधिक प्रमाणात उद्भवतो. ब्लीचमुळे चेहरा लाल अथवा कोरडा होऊ शकतो.

संरक्षण कसे करालअतिनील किरणांची तीव्रता सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या काळात जास्त असते. त्या काळात बाहेर पडणे टाळावे. पूर्ण बाह्यांचे शर्ट वापरावेत. स्त्रियांनी सनकोट घालावा व चेहºयाला स्कार्फ बांधावा. रंगीत कपडे वापरणे कधीही चांगले.उन्हापासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन वापरा. साधारण १५पेक्षा जास्त एसपीएफ असणारे सनस्क्रीन चांगले. ज्या व्यक्तींना उन्हाची अ‍ॅलर्जी आहे, त्यांना ए प्रकारच्या अतिनील किरणांवर काम करणारे सनस्क्रीन वापरावे लागते. झिंक आॅक्साइड व टायटॅनियम डायआॅक्सिड असणारे सनस्क्रीन्स खेळाडूंना अधिक परिणामकारक ठरतात. मुरमे येत असलेल्या व्यक्तींनी ‘जेल’ प्रकारचे सनस्क्रीन वापरावे.घामोळे कमी करण्यासाठी सुती व सैल कपडे घालावेत. थंड पाण्याने दिवसातून दोन वेळा आंघोळ करावी. घामशोषक पावडरीचा वापर करावा. खाज टाळण्यासाठी योग्य गोळ्यांचा वापर करावा, तसेच दिवसभर पुरेसे पाणी, शक्य असल्यास लिंबूपाणी पीत राहावे.घामामुळे आलेल्या ओलसरपणामुळे जांघेत, काखेत नायट्याचे चट्टे तयार होतात. या रोगाच्या उपचारांसाठी शुद्ध अँटीफंगल मलम लावावे. स्टिरॉइडमिश्रित मलमांचा वापर टाळावा. या रोगाचे उपचार शक्यतो डॉक्टरांकडे (शक्य असल्यास त्वचारोग तज्ज्ञांकडे) जाऊनच करावेत. परस्पर केमिस्टकडून मलम आणणे टाळावे.

(लेखक त्वचारोग तज्ज्ञ आहेत)

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य