सोने खरेदीवर तोळ््यामागे २६० रुपयांची सूट
By Admin | Updated: March 26, 2015 00:44 IST2015-03-26T00:44:52+5:302015-03-26T00:44:52+5:30
सोने खरेदीवर आता प्रत्येक तोळ््यामागे ग्राहकांना कमाल १०० मिलीग्रॅमची सूट देण्याचे बंधन सराफांवर येणार आहे.

सोने खरेदीवर तोळ््यामागे २६० रुपयांची सूट
चेतन ननावरे ल्ल मुंबई
सोने खरेदीवर आता प्रत्येक तोळ््यामागे ग्राहकांना कमाल १०० मिलीग्रॅमची सूट देण्याचे बंधन सराफांवर येणार आहे. वैध मापन शास्त्र विभागामार्फत अशा आशयाचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सोने खरेदीवर ग्राहकांना सरासरी एका तोळ््यामागे २६० रुपयांची बचत होणार आहे.
सराफा बाजारात सध्या १० मिलीग्रॅम ‘ई’ (एरर) व्हॅल्यू असलेल्या इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापर केला जात आहे. मात्र त्यामुळे एक तोळा सोन्यामागे ग्राहकांची किमान २० मिलीग्रॅमपासून कमाल १०० मिलीग्रॅमची लूट होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळे सराफांनी १ मिलीग्रॅम ‘ई’ (एरर) व्हॅल्यू असलेले इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वापरण्याचे आदेश विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी दिले होते. राज्यात १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार होती. शिवाय १ मिलीग्रॅमचा काटा वापरण्यास नकार देणाऱ्या सराफांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागाने दिले होते. मात्र इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) या सराफा संघटनेने या निर्णयाला विरोध केला होता.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यात १ मिलीग्रॅम ई व्हॅल्यू असलेल्या काट्यांची खरेदी करण्यासाठी सराफांना १ लाख ५० हजार रुपये खर्चावे लागणार होते. जे ग्रामीण भागातील छोट्या सराफांसाठी खूपच खर्चीक होते. परिणामी सरकारने हा निर्णय रद्द करण्याची मागणी संघटनेने केली होती.
चोरी नव्हे, हा केवळ तांत्रिक घोळ!
१० मिलीग्रॅमच्या ई व्हॅल्यू काट्यावर कोणत्याही धातूचे १०० मिलीग्रॅम ते १ ग्रॅमपर्यंत वजन करताना १० मिलीग्रॅमची तफावत निर्माण होण्याची शक्यता असते. अर्थात एक तोळे म्हणजेच १० ग्रॅम सोने खरेदी करताना १०० मिलीग्रॅमपर्यंतची तफावत निर्माण होते. अर्थात सरासरी २६ हजार रुपयांचे सोने खरेदी केल्यानंतर ग्राहकांना कमाल २६० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत होता.
सराफांकडून स्वागत
याआधीही १ ग्रॅममागे १० मिलीग्रॅमची तूट निर्माण होत होती. मात्र ग्राहकांना तेवढी सूट देत असल्याची प्रतिक्रिया बॉम्बे बुलियन असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली. यापुढे ही सूट कागदोपत्री होणार असेल, तर सराफांनी विरोध करण्याचा प्रश्नच नाही. मात्र ग्रामीण भागात वीजेची सोय नसताना १ मिलीग्रॅम ई व्हॅल्यूचे काटे लावणे अशक्य असल्याने तो आदेश रद्द करून अशी तरतूद होणार असेल, तर निर्णयाचे स्वागत आहे.
आज निर्णय होण्याची शक्यता!
सराफा संघटनेचे शिष्टमंडळ आणि प्रशासनात नुकतीच चर्चा झाल्याचे समजते. १ मिलीग्रॅमचा काटा ठेवताना दुकानात एअर कंडीशनर लावण्याची गरज असल्याचा दावा संघटनेने केला. पंख्याच्या हवेनेही काट्याची अचूकता खंडीत होते. प्रत्येक दुकानात एसी लावणे दुकानांना परवडणारे नाही. परिणामी ग्राहकांना १ ग्रॅम सोने खरेदीमागे १० मिलीग्रॅम सोन्याचा परतावा सराफ करतील, असा तोडगा निघाल्याचे समजते. जुन्या आदेशातील बदलांचे नोटीफिकेशन्स बुधवारी निघण्याची शक्यता आहे.
...तर प्रति तोळा मिळणार २६० रुपये
सध्या सोन्याचा सरासरी भाव प्रति तोळा २६ हजारांच्या घरात आहे. १ ग्रॅममागे १० मिलीग्रॅमचा फरक पडत असल्याने प्रत्येक तोळ््यामागे ग्राहकांना १०० मिलीग्रॅमप्रमाणे २६० रुपयांचा परतावा मिळू शकतो. लग्नाचा सीझन असल्याने आणि महिना भरावर आलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकांचे हजारो रुपये वाचण्याची शक्यता आहे.