पती नातेवाइकांशी बोलल्याने आत्महत्या
By Admin | Updated: January 6, 2015 02:16 IST2015-01-06T02:16:36+5:302015-01-06T02:16:36+5:30
संभाषण केल्याचा राग आल्याने त्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ४ जानेवारी रोजी सायंकाळी उजेडात आला.

पती नातेवाइकांशी बोलल्याने आत्महत्या
भार्इंदर : १० वर्षांपासून माहेरील नातेवाइकांशी अबोला धरलेल्या विवाहितेच्या पतीने मात्र त्यांच्याशी संभाषण केल्याचा राग आल्याने त्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ४ जानेवारी रोजी सायंकाळी उजेडात आला.
काशिमीरा पोलिसांच्या हद्दीतील जांगीड इस्टेट गृहसंकुलाच्या भानू इमारतीत राहणाऱ्या गीता अरविंद सैनी (४३) यांनी विवाहानंतर २००५ मध्ये घरखरेदीसाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली. वडिलांनी नकार दिल्याने गीता यांनी त्यांच्यासह माहेरच्या इतर नातेवाइकांशी अबोला धरला होता. परंतु पतीने ३ जानेवारी रोजी गीता यांच्या वहिनीसोबत फोनवर संभाषण केल्याचा राग त्यांना आला. यामुळे त्यांनी पतीसोबत सुद्धा बोलणे बंद केले, यातून हा प्रकार घडला. (प्रतिनिधी)