Join us

कैद्याची तुरुंगात आत्महत्या, आर्थर रोड जेलमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 06:25 IST

आर्थर रोड कारागृहात गळफास घेत २६ वर्षीय कैद्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. साबिरअली गरीबुल्ला शेख असे त्याचे नाव असून तो हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता.

मुंबई : आर्थर रोड कारागृहात गळफास घेत २६ वर्षीय कैद्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. साबिरअली गरीबुल्ला शेख असे त्याचे नाव असून तो हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता.गेल्या वर्षी एमआयडीसीतील वसीउल्ला शेख उर्फ रसगुल्ला (४०) या पोलीस खबºयाला सहा भंगार विक्रेत्या दलालांनी मारहाण करून त्याची हत्या केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मुख्य आरोपी शोहराबअली शहा (२५) व मोहब्बतअली शहा (२८) यांच्यासह साबिरअली याला अटक केली होती. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर साबिरअलीची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती.काही दिवसांपासून शेख तणावाखाली होता. त्याला येथील मेंटल वॉर्डमध्ये ठेवले होते. सोमवारी पहाटे त्याने कोठडीतील दरवाजाच्या ग्रीलला चादर बांधून गळफास घेतला. सकाळी अन्य कैद्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मानसिक तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दीड महिन्यापूर्वीही शेखने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :तुरुंग